Home महाराष्ट्र *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून अभिवादन

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून अभिवादन

143

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी-म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6डिसेंबर):-विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजी 65 महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून सातारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष चेतन आवडे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अपुर्ण राहिलेलं कार्य पुर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागली तरी चालेल पण ते कार्य पुर्ण करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा समाजात काम करणार आणि त्यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार बाबासाहेबांना अपेक्षित असलेले, ‘My Education For My Society’ या तत्वावर अंमल करणारे सामाजिक इमानदार आणि सामाजिक बांधीलकी जपणारे विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून समाजात काम करत आहेत. बहुजन समाजातील
विद्यार्थ्यांनी सुद्धा भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटन मध्ये जुळून बाबासाहेबांचे विचार जपत त्यांची क्रांती ची मशाल सतत तेवत ठेवण्यासाठी कार्य करावे अशी अपेक्षा व या देशाचे भविष्य विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.

विद्यार्थी आपल्या समाजातील बुध्दिमान वर्ग आहे आणि जनमत घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे हा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा दिव्य संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा काम करणार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडविण्याचे काम भारतीय विद्यार्थी मोर्चा करत आहे व त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संकल्प करण्यात आला.असे चेतन आवडे यांनी सांगितले व अभिवादन करताना उपस्थित पदाधिकारी राज्य प्रवक्ता,प्रथमेश ठोंबरे, जिल्हाध्यक्ष चेतन आवडे,तालुका अध्यक्ष, कुणाल देवकुळे,शहर अध्यक्ष रोहित नितनवरे सिध्दार्थ वाघमारे ,विकास पवार इ. विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here