



🔸सिंदेवाही येथे संतोष मेश्राम यांच्या ‘ताटवा’ झाडीकाव्यसंग्रहाचे प्रकाशन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
सिंदेवाही(दि.6डिसेंबर);-झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती साकोली संलग्नित शाखा सिंदेवाही च्या वतीने शाखेचा दुसरा वर्धापनदिन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी कवी संतोष मेश्राम यांच्या ‘ताटवा’ या झाडी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
ह्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर उद्घाटक म्हणून भूभरीकार कवी अरुण झगडकर (गोंडपिपरी) तर भाष्यकार म्हणून मुल येथील मोरगडकार कवी लक्ष्मण खोब्रागडे लाभले होते.वर्धेच्या कवयित्री संगीता बढे, यवनाश्व गेडकर , ज्येष्ठ कवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे, कल्पतरू विद्यामंदिर चे संस्थापक धनंजय बंसोड, डॉ. रविंद्र शेंडे , केंद्रप्रमुख विलास सावसाकडे यांची उपस्थिती होती . शाखाध्यक्ष नेताजी सोयाम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या नंतर कवी संतोष मेश्राम यांच्या पहिल्या ‘ताटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिंदेवाही शाखा,जिल्हा शाखा आणि जि. प. शाळा शिवणी येथील शिक्षकवृंदाच्या वतीने कवी मेश्राम यांचा सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. संतोष मेश्राम यांनीही काव्यप्रकाशनासंबंधी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उद्घाटक अरूण झगडकर म्हणाले, काव्यसंग्रह ताटवा मधून झाडीतील लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
तसेच त्यातून समाजमन जागृत करण्याची इच्छाशक्ती निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. भाष्यकार म्हणून कवी लक्ष्मण खोब्रागडे म्हणाले की, ‘ताटवा’ झाडीकाव्यसंग्रह वाचनीय असून त्यातून झाडीपट्टीच्या जीवन जाणिवा अधोरेखित होतात. म्हणूनच बोली भाषेला समृद्ध करण्यासाठी प्रत्येक बोली अभ्यासकांनी झटले पाहिजे. सिंदेवाही शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन मुक्तछंद काव्यप्रकारांतर्गत ‘ताटवा’ या विषयावर काव्यस्पर्धा घेण्यात आलेली होती.त्या काव्यस्पर्धेचा निकाल नेतराम इंगळकर यांनी घोषित केला .
त्याकाव्यस्पर्धेत संजीव बोरकर गडचिरोली, मधुकर दुफारे चंद्रपूर, अनिल आंबटकर चंद्रपूर, शीतल कर्णेवार देवाडा आणि सिद्धार्थ चौधरी भंडारा यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्या ठरलेल्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या भागात
कवयित्री संगीता बढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात यात भावना खोब्रागडे, प्रदीप मडावी, विरेनकुमार खोब्रागडे, सुनील पोटे, मनिषा मडावी, रामकृष्ण चनकापुरे, नागेंद्र नेवारे, वृंदा पगडपल्लीवार, प्रीती जगझाप, दिलीप पाटील, छाया जांभुळे, प्रमोद मडावी, आनंद बोरकर, सुरेश गेडाम, उपेंद्र रोहणकर, अरुण घोरपडे, परमानंद जेंगठे, नंदकिशोर मसराम, विशाल मोहुर्ले, जयंती वनकर, जयंत लेंझे आदींनी कविता सादर केल्यात. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन कवी अनिल अवसरे आणि नेतराम इंगळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बेनिराम ब्राह्मणकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.पी.पुट्टावार, कल्पतरू विद्यामंदिर चे संस्थापक धनंजयजी बंसोड, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे, डॉ. आशिष सोनवाणे, भावनाताई गुंडमवार, अनिल कोडापे, पवन मोहुर्ले, सुनील उईके, दीपक मोटघरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.


