Home महाराष्ट्र “डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे भारतीयांच्या खऱ्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा होय”- रामचंद्र सालेकरं

“डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे भारतीयांच्या खऱ्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा होय”- रामचंद्र सालेकरं

141

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

वरोरा(दि.6डिसेंबर):- महामानव विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे प्रकाश रामटेके अध्यक्ष शालेय व्यवस्थापण समिती वाघनख यांचे अध्यक्षतेखाली तथा सौ.संध्याताई डफ उपाध्यक्षा यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी रामचंद्र सालेकर मुख्याध्यापक तथा राज्यउपाध्यक्ष शिक्षण महर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेलं संविधान भारतीयांच्या खऱ्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा असल्याचे सांगीतले. या संविधानामुळेच प्रत्येक भारतीय नागरिक सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, आर्थिक, गुलामीतून मुक्त झाला आहे. देशाचा जागृक आदर्श नागरिक बनण्यासाठी शाळाशाळातून संविधानाच्या प्रत्येक ३९५ कलमांचा इतंभू अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याला होणे आवश्यक आहे.

त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तरात संविधान असने गरजेचे असून प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या दप्तरात संविधान असलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना केले.मुलांच्या भाषणानंतर अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली,कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ.रेखा थुटे मॕडम यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन श्रावणी रामटेके व रुद्र डफ या विद्यार्थ्यांनी केले तर आभार शारदा नैताम या विद्यार्थीनीने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here