Home महाराष्ट्र गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

120

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6 डिसेंबर) -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात आदरांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम प्रा. सुप्रिया तलमले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.टी. देवढगले हे होते. याप्रसंगी बोलताना प्रा. सुप्रिया तलमले म्हणाल्या की, अन्याय, अत्याचाराच्या अंधकारात अडकलेल्या शोषितांची बाबासाहेब प्रकाशवाट आहेत. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. संतोष पिलारे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार सर्वकालिक व सर्वव्यापी आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण व प्रसार करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एम. टी. देवढगले म्हणाले की, शोषितांच्या आकांक्षांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यावर आधारित भारतीय समाजव्यवस्थेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा आधार देऊन नवा भारत निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी लिहिलेले संविधान सर्वसामान्यांना वर्तमान व भविष्याची हमी देते.या कार्यक्रमाचे संचालन सुनील पारधी तर आभार कु. पायल ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. जयगोपाल चोले, प्रा. पल्लवी धोंगडे, प्रा. अश्विनी बोरकुटे,प्रा. कविता भागडकर, प्रा. ओमादेवी सहारे,प्रा. तृप्ती नागदेवते, अनिल प्रधान, उमेश राऊत तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here