Home महाराष्ट्र मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते 1 कोटी 48 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे...

मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते 1 कोटी 48 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

103

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.6डिसेंबर):-शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 येथील प्रज्ञा कॉलनी व साई कॉलनी परिसरामध्ये विविध विकास कामांकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी “अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा ” योजने अंतर्गत 1 कोटी 48 लक्ष रुपये निधि उपलब्ध करुन दिला आहे. मोर्शी शहरातील विविध विकास कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला .
आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. दरम्यान मोर्शी शहराचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आ. देवेंद्र भुयार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच भरगॊस निधी खेचून आणला आहे .

या निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे .मोर्शी शहरामध्ये कीर्तनकार ते दवंडे यांच्या घरापर्यंत रोडचे बांधकाम करणे करीता 14 लक्ष 11 हजार 761 रुपये, निधी, प्रज्ञा बुद्ध विहार येथील ओपन स्पेस मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे करिता 12 लक्ष 30 हजार 785 रुपये, श्री.तायडे ते बांबोळे ते पचारे यांच्या घरापर्यंत रोडचे बांधकाम करणे करिता 22 लक्ष 41 हजार 070 रुपये, तागडे सर ते किर्तकार यांचे घरापर्यंत रोडचे बांधकाम करणे करिता 16 लक्ष 23 हजार 299 रुपये निधी, गाडगे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस विकसित करणे व श्री. गाडगे यांचे घरासमोरील रोड व नाली बांधकाम करणे या कामाकरिता 35 लक्ष 75 हजार 115 रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. बांबोळे सर ते श्री.तायडे यांच्या घरापर्यंत काँक्रिट नाली बांधकाम करणे 10 लक्ष रुपये, बांबोळे यांच्या घरासमोरील ओपन स्पेसमध्ये सभागृह बांधकाम करणे या कामाकरिता 27 लक्ष 379 रुपये निधी, वानखडे यांचे घरासमोरील ओपन स्पेसला चैन लिंक फेन्सिंग करणे 20 लक्ष 22 हजार 987 रुपये, मोर्शी शहरातील विविध विकसकामांकरिता 1 कोटी 48 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली .

यावेळी भूमिपूजन सोहळ्याकरिता आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष सौ.मेघनाताई मडघे, उपनगराध्यक्षा आप्पासाहेब गेडाम नगरसेवक क्रांतीताई चौधरी, सौ.विद्याताई ढवळे, सुनीताताई कोहळे बांधकाम सभापती रवी गुल्हाने, नगरसेवक नितीन पन्नासे, मोहन मडघे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, विनोद ढवळे, शेर खान, विलास ठाकरे, घनश्याम कळंबे, मिलिंद पन्नासे, प्रा.आनंदराव तायडे , रूपेश मेश्राम, मते सर, संजय वानखडे, वंजारी साहेब, साहेबराव वानखडे, गौतम तायडे, ढोले साहेब, खोब्रागडे सर, तागडे सर, मनोहर इंगळे सर, रवि नागले, देवेंद्र खांडेकर, विनोद गेडाम, तट्टे साहेब, पंकज राऊत, आकाश छापाने, अमन गायकी, स्वप्निल वानखडे, रोषण किरतकार, प्रियांशु तायडे तसेच प्रभागातील इतर नागरिक आणि सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here