Home महाराष्ट्र कर्तव्य बजावनारे जाबाज पत्रकारांचे पत्रकारांच्या वतीने सत्कार

कर्तव्य बजावनारे जाबाज पत्रकारांचे पत्रकारांच्या वतीने सत्कार

107

🔸पत्रकार संदेश कान्हु व सैय्यद फैजान यांच्या धाडसाचा गौरव

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5डिसेंबर):-पत्रकार हे नेहमीच कोणत्याही राजकीय सामाजिक आणि जनहिताच्या बातम्या जणते आणि शासना समोर मांडतात आपले जीव धोक्यात घालून अतिसंवेदनशील घटनेचे वार्तांकन करीत असतात. अनेक वेळा पत्रकारांवर हल्ले सुद्धा होतात. अशा दंगलग्रस्त स्थितीत घाबरून न जाता व आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कार्य चोखपणे बजावनारे पुसद येथील धाडसी आणि जाबाज पत्रकार संदेश कान्हु, सैय्यद फैजान व ऋषी जोगदंडे यांचा पुसद येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्या वतीने रविवारी जाहीर सत्कार करण्यात आला.

काळी दौलत खान येथे शुक्रवारी दंगल घडली होती या दंगली दरम्यान पुसद येथील लोकप्रतिनिधी ऍड निलय नाईक काळी मध्ये शांततेचे आवाहन करत असल्याने न्यूज कवरेजसाठी पत्रकार संदेश कान्हु व सैय्यद फैजान हे दंगलग्रस्त काळी दौलत खान शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास पोहोचले. मात्र लोकप्रतिनिधी आमदार ऍड निलय नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक दोन्ही आमदारांसमोर पत्रकारांना धक्काबुक्की तसेच बेदम मारहाण करण्यात आली व जीवघेणा हल्ला जमावाने या दोन्ही पत्रकारांवर चढवला. त्यांच्याजवळील असलेले संपूर्ण साहित्य बळजबरी हिसकावून घेण्यात आले. असे असले तरी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय चोखपणे कार्य बजावणाऱ्या व सत्य जनतेसमोर मांडणाऱ्या संदेश कान्हु, आणि सैय्यद फैजान तसेच ऋषी जोगदंडे या धाडसी पत्रकारांचा रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हार व पुष्पगुच्छ देऊन या तीनही पत्रकारांना गौरविण्यात आले. पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार भविष्यात घडू नये याकरिता शासनाने तसेच प्रशासनाने या हल्ल्यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार ललित सेता,अनिल ठाकूर, बळवंत मनवर, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे, मारोती भस्मे, अमोल व्हडगिरे, सैय्यद मुजीबोद्दीन, संजय कुमार हनवते,रामदास कांबळे, रवि मोगरे, बाबूलाल राठोड, प्रकाश खंडागळे, मनीष दशरथकर, दिनेश खांडेकर,राजू सोनूने, भैय्यासाहेब मनवर, अहमद पठाण, दीपक महाडिक, शेख शब्बीर, प्रदीप नरवाडे, हाफिझ रब्बानी, मुबाशिर शेख, बाबा खान, पवन चव्हाण, उमेश जाजू, अमोल ठाकूर, शेख अक्रम सर, आदी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here