Home महाराष्ट्र ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

358

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.4डिसेंबर):-आज दि. ३डिसेंबर २०२१ रोजी धरणगाव पंचायत समिती येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्रात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री जयदीप पाटील सर (आय. डी. समन्वक प.स.धरणगाव) यांचे हस्ते करण्यात आले.दिव्यांग बांधवांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करुन यु डी आय डी कार्ड चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मुक बधीर विद्यालय धरणगाव चे मुख्याध्यापक श्री वाल्मिक पाटील सर, श्री संतोष भडांगे सर, प.स.धरणगावचे दिपक पाटील सर,तुळशीराम सैंदाने सर आदींनी दिव्यांगांच्या विविध योजनांविषयी माहिती दिली.धरणगाव तालुका दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री किशोर प्रतापराव पाटील सर यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमास कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here