Home महाराष्ट्र थोरगव्हाण येथील जि.प.प्राथमिक शाळेला लोकसहभागातुन संगणक भेट

थोरगव्हाण येथील जि.प.प्राथमिक शाळेला लोकसहभागातुन संगणक भेट

225

🔸ग्रामस्थांच्या मदतीने होणार शाळेचा कायापालट….

🔹शाळेचे माजी विद्यार्थी मदतीसाठी पुढे सरसावले…

✒️यावल प्रतिनिधी(निलेश धर्मराज पाटील)

यावल(दि.4डिसेंबर):- २०२१ रोजी “ गाव करील ते राव काय करील” या म्हणीचा अर्थ यावल तालुक्यातील थोरगव्हाणच्या गावकर्‍यांनी प्रत्यक्षात उतवरला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून डीजीटल करण्याचा निर्णय घेऊन शाळेला संगणक व एल.ई.डी.टि.व्हि.भेट दिला.

यावल तालुक्यातील थोरगव्हाण हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव आणि गावात जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची ४ थी पर्यंत शाळा आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १३१ असून विद्यार्थी गुणवत्ता अतिशय चांगली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप साठी भरपूर विद्यार्थी येथून पात्र झालेले आहेत.

कोवीड १९ च्या काळात शाळा बंद असूनही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आभ्यास देत शिक्षण पुर्ण केले व शासनाच्या १६ कलमी कार्यक्रमाची रुपरेषा पालकांच्या लक्षात आणुन लोकसहभागातुन शाळेच्या समस्या मांडुन सोडविण्यासाठी पालकांना आग्रह करुन शाळेच्या कायापालट करण्यास सुरुवात करण्यात आल्याने शाळेच्या कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

शाळा व्यवस्थापन समीतीचे आजी, माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तसेच पदाधिकारी, आणि गावातील दानशुर व्यक्तीच्या घरी समिती सदस्य घरोघरी जाऊन लोकांना याची माहिती दिली आणि लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली. १०० रुपयांपासून ११,०००रू. पर्यंत ४३,३६० रुपये ग्रामस्थांनी देणगी दिली.

जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे माजी विद्यार्थी यांचे कडून 16 कलमी कार्यक्रम अंतर्गत शाळेत संगणक, वॉश बेसिन, परस बाग, बाला पैंटिंग सदर कामे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत वित्त आयोग निधी मार्फत करून शालेय विकास करण्याचा आवाहनला प्रतिसाद देत शालेय कामे पूर्ण करणे याकामी लोकसहभागातुन नीधी जमा करून माझी शाळा मी जबाबदार या अनुषंगाने जबाबदारी घेऊन मदत करीत दोन संगणक भेट दिले असल्याची माहिती मुख्यध्यापक महेद्र देवरे यांनी दिली. तसेच शाळेतील शिक्षक एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील, निलेश माधवराव पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, व सर्व सदस्य , पोलीस पाटील , व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. अशीच ग्रामस्थांनी मदत केली तर मराठी शाळेचे रुप बदलायला वेळ लागणार नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here