Home महाराष्ट्र शिवाजी नगर माजरी येथील अतिक्रमण नियमाकुल करा- प्रहार जनशक्ति पक्षाची मागणी

शिवाजी नगर माजरी येथील अतिक्रमण नियमाकुल करा- प्रहार जनशक्ति पक्षाची मागणी

381

✒️मनोज गाठले(वरोरा,विशेष प्रतिनिधी)मो:-97678 83091

वरोरा(दि.4डिसेंबर):- भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर येथिल गट क्रमांक २० चराईसाठी राखीव असलेल्या जागेवर तीन पिढ्यांपासून अतिक्रणकरून राहत असलेल्या रहिवाश्यांनी प्रहार जनशक्ति पक्षाचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रूग्णमित्र गजु कुबडे यांची भेट घेत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर कथन केल्या त्यावरून कुबडे यांच्या आदेशावरून प्रहारसेवक आशिष घुमे यांच्या नेतृत्त्वात ३ डिसेंबर रोज शुक्रवारला नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

भद्रावती तालुक्यातील शिवाजी नगर गट क्रमांक २० या चराई साठी राखीव असलेल्या सरकारी जागेवर येथिल रहिवासी तीन पिढ्यांपासून अतिक्रमण करून रहात आहेत . ते अतिक्रमण नियमित करण्याबाबत त्यांनीं ग्रामपंचायत , तहसिलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अर्ज करूनही अजून पावेतो त्यांना न्याय मिळाला नाही . त्यामुळे त्यांना कुठल्याही शासकिय योजना तसेच सुख सुविधा मिळत नाही तसेच त्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे . त्यामूळे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य आहे . यामुळे आज पावेतो काहींना जीव गमवावा लागला.

शासन निर्णयानुसार १९८५ पूर्वी असलेले शासकिय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचे अधिकार .तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून त्या नुसार त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना न्याय द्यावा .अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा ही निवेदना द्वारे देण्यात आला . यावेळी प्रहार सेवक आशिष घुमे , जगदीश लांडगे , प्रमोद देठे , रवी होले . मीराबाई पेंदोर, रसिका उईके , सुनीता आत्राम , कुंता सलाम , शोभाबाई सलाम, मीराबाई मेश्राम , चंद्रकला शास्त्रकार, अर्चना मडावी तथा ईतर रहिवाशी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here