




🔸हदगांव तालुक्यात दिव्यांगाचे कोरोणा लसीकरण 90% पुर्ण
✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-93738 68284
नांदेड(दि.3डिसेंबर):- जागतिक दिव्यांग दिनी निमित्ताने उप जिल्हा रुग्णालय हदगांव येथे हदगांवचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व तहसिलदार जिवराज डापकर आणि दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व उप जिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर यांच्या हस्ते सर्व प्रथम महा मानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांचे मुक बधीर बंधु जमीर पटेल यांना कोरोणा लसीकरण करून या मोहीमेला सुरूवात करण्यात आले.
व तसेच सर्व उपस्थित मान्यवर व दिव्यांगाला डॉक्टराच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ,आणि नारळ देऊन सत्कार करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांगाला कोरोणा विषांणु मात करण्यासाठी व शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दिव्यांग व्यक्तिसाठी विशेष कोरोणा लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाला हदगांव तालुक्यातील सर्व दिव्यांगानी चांगला प्रतिसाद दिला.व तसेच हदगांव तालुक्यात जवळपास 90 टक्के दिव्यांग लसीकरण झाले असुन नांदेड जिल्ह्यात हदगांव तालुका प्रथम क्रमांकावर असल्याचा डॉ.ढगे यांनी यावेळी सांगितले.
व तसेच दिव्यांगाला कोरोणा विषयी उपाय योजनेसाठी म्हणजे मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतर या त्रिसुत्राचे पालन विषयी आणि आरोग्य विषयी सर्व योजनेबद्दल डाॅ.व्हि.जी ढगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. आणि उप जिल्हा रुग्णालयात दिव्यांगाच्या कामाला व लसीकरणाला प्रथम प्राधान्य दिले जाईल.दिव्यांगाचे आॅन लाईन प्रमाणपत्र असो किंवा संजय गांधी निराधार योजनेसाठी वयाचे प्रमाणपत्र, किंवा सर्व आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ईतर सर्व आरोग्य सेवा हि दिव्यांगासाठी विना मुल्य दिले जाईल.दिव्यांग व्यक्तीसाठी सध्या स्थितीत अस्थिरव्यंग व नेत्रहिण हे दोन प्रकाराचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात येत असुन लवकरच मतीमंद व मुक बधीर आणि ईतर प्रवर्गाचे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वरीष्ठ अधिकारीला पाठ पुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अतिशय सुंदर सुत्रसंचलन राम वट्टमवार यांनी केले.तर आभार सुनिल तोगरे यांनी मानले. त्यावेळी त्यांच्या सोबत डाॅ.प्रदिप स्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मुरमुरे, डॉ.दिपक कदम, डाॅ.दादासाहेब ढगे, डाॅ.तोष्णीवाल, डाॅ. पोटे, डाॅ.निमडगे, डाॅ. गंगासागर, डाॅ.भद्रे , सुनिल तोगरे, प्रियंका कदम, दिपाली दुधारे, वर्षा जाधव, आणि दिव्यांग शाळेचे शिक्षक गजानन मोरे, राम वट्टमवार, धारेश्वर डाके, संजय तावडे, शिवाजी पाळेकर, सुदेश आगरकर, शिवकुमार काष्टे, बालाजी वाघमारे, सजींव उंडाल, संजय बोधने, तानाजी ईबितवार, हनमंत बरसमवार, सेवक राठोड यांच्या सह शेकडो दिव्यांग व्यक्ती जागतिक दिव्यांग दिनी यावेळी उपस्थित होते….




