Home महाराष्ट्र पक्ष हेच माझे कुटुंबं समजून केलेल्या कामाचे मिळाले फळ- सुरेश बंडगर

पक्ष हेच माझे कुटुंबं समजून केलेल्या कामाचे मिळाले फळ- सुरेश बंडगर

130

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3डिसेंबर):- रोजी शासकीय विश्राम गृह गंगाखेड यथील पत्रकार परिषद घेवुन झालेला अन्यायाबाबत सुरेश बंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ठ केली.25 वर्षाचा यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्ष असा प्रवास करून आणी महादेव जानकर यांना दैवत माणुन, पक्ष हेच माझे कुटुंबं समजून रात्र दिवस एक करून पक्षाच्या वाढीसाठी घालवले असून त्याच पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात आली. या पेक्षा दुर्दैव ते काय असु शकत असा भावनिक सवाल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुरेश बंडगर यानी केला.
ऐका कार्यकरत्याने माझा फोटो मला कल्पना न देता, ऐका व्यक्तीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर लावले म्हणून मला पक्ष नेतृत्वाने काम थांबवण्यासाठी सांगणे आणी माझी बाजु ऐकुन न घेते मला पक्षातुन काढण्यात आले.

मी आजपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष ही माझी हक्काची झोपडी समजुन होतो पण एका क्षणात मला त्या झोपडीतुन बाहेर काढण्यात आले.वयाची 25 वर्षे घालवुन आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याने कोणाकडे का जावे हा प्रश्न भेडवत आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी निष्ठावानाची कदर केली नसल्याची खंत वाटते. चळवळीतुन तयार झालेले कार्यकर्ते आता पक्षाला नकोसे झाले आहेत का?संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर बंडगर यांचा फोटोपाहुन पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्या मुळे बंडगर यांच्या सारख्या कार्यकर्त्यानी बंडगर जात्यात आहेत तर सुपातील कार्यकर्त्यांनी आपलाही नंबर जात्यात लागणार आहे हे ओळखावे असे सुचक अवाहन केले.परंतु मी या पुढे सामाजिक कार्य करतच राहणार असून माझा राजकीय प्रवास येथेच थांबवणार असे स्पष्ट केले.तर या वेळी त्यांनी महादेव जानकर यांची आडीओ क्लिप पत्रकारांना ऐकवली. आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here