Home महाराष्ट्र मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

113

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.3डिसेंबर):- आज दि.३ डिसेंबर २०२१ रोजी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगांव संचलित के.जी.गुजराथी मुकबधीर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालय, मुक बधीर निवासी कार्यशाळा (I.T.T.) धरणगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.श्री.प्रमोद पाटील (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव) यांचे हस्ते डॉ.हेलन केलर यांचे प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

प्रमुख अतिथी श्री जयदीप पाटील सर ,( दिव्यांग विभाग प्रमुख पंचायत समिती धरणगाव) , विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष भडांगे सरांना केले. दिव्यांगांचे हक्क, अधिकार व कायदे याविषयी ॳॅड. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.श्री.तुळशिराम सैंदाने सर (वि.शिक्षक प.स.धरणगाव ) यांनी मार्गदर्शन केले.

श्री.दिपक पाटील सर (वि.शिक्षक प.स.धरणगाव ) यांनी डॉ.हेलन केलर यांच्या जिवनावर आधारित पोवाडा सादर केला.श्री.अतुल पाटील सरांची व आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष भडांगे सरांनी व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री वाल्मिक पाटील सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here