Home महाराष्ट्र नाशिक जिल्हा रुग्णालयात मैञेय चाणक्य कलामच वतीने जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा

नाशिक जिल्हा रुग्णालयात मैञेय चाणक्य कलामच वतीने जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा

226

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.3डिसेंबर):-जिल्हा शल्यचिकित्सालय नाशिक ,मनोज स्मृती धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन नाशिक ,मैत्रेय चाणक्य कलामंच नाशिक , विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजराआज जिल्हा शैल्यचिकित्सालय नाशिक या ठिकाणी साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी अनेक कलाकार म्हणून संस्था उपस्थित होत्या .या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.थोरात साहेब व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते . जिल्हा शल्यचिकित्सक थोरात साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.मनोज स्मृती धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशन नाशिक या संस्थेचे डॉ.प्रभाकर वडजे आणि त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमासाठी उपस्थित होती .

मैत्रेय चाणक्य कलामंच नाशिक यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर असे पथनाट्य सादर करण्यात आले .या पथनाट्याच्या माध्यमातून एड्स या रोगाची लक्षणे , प्रसार कसा होतो ,त्यावर इलाज काय आहे आणि या रोगाविषयी सविस्तरपणे जाणिव जागृतीपर माहिती देण्यात आली. एड्स या महाभयंकर रोगाविषयी ज्या चुकीच्या अफवा व गैरसमज आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली .चुकीच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे पथनाट्यातून जनतेला सांगण्यात आले.

गीत गायनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वांना जागृत करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी मैत्रेय चाणक्य कलामंच नाशिक यांचे कलाकार संतोष वाळवंटे, सौ बबीताताई वाळवंटे, सौ .सुचीताताई साळुंके , श्रेया वाळवंटे ,अजय वाघमारे ,शुभम वाघमारे , ज्येष्ठ कलाकार दत्ता वाळेकर आणि व पथकाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश साळुंके यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज स्मृति धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन नाशिकचे डॉ. प्रभाकर वडजे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here