Home महाराष्ट्र चिमूर नप क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त

चिमूर नप क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त

93

🔹शहर कांग्रेस कमिटीने मुख्यमंत्री यांना निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3डिसेंबर):- ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषद च्या गलथान व दुर्लक्षित धोरणामुळे जनतेला दैनंदिन समस्येला त्रस्त होत असल्याने याची दखल घेत जीप गट नेते तथा विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शन खाली शहर कांग्रेस कमेटीचे वतीने मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महा.राज्य यांना मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय चिमुर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

चिमूर शहरातील आठवडी बाजार ची जागा नसल्याने रस्त्यावर बाजार होत असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहतुकीची कोंडी होत आहे.तेव्हा आठवडी बाजाराची जागा उपलब्ध करून देण्यात यावी.शहरातील। पिण्याच्या पाण्याकरिता पाईप लाईन खोदकाम सुरू असून जनतेला त्रास होत आहे याची व्यवस्था करून देण्यात यावी. नाल्या पूर्णतः तुडूंब झाल्या असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तेव्हा कारवाई साठी दखल घेण्यात यावी. ग्राम पंचायत काळातील अंगणवाडी केंद्र नगर परिषद ला हस्तांतरीत करण्यात याव्या. नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या योजना जनजागृती करण्यात यावी. जीप व पस समिती योजना नप मार्फत राबविण्यात याव्या. तत्कालीन वडाळा पैकू ग्राम पंचायत चे दस्तऐवज हस्तांतरण करण्यात यावे. काग व बाम्हणी गावात कचरा गाडी जाण्यास आदेशीत करावे,अभ्यंकर मैदानावरील जीर्ण पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधकाम करण्यात यावे, शहरातील सिमेंट रोड फोडलेले असून दुरुस्त करण्यात यावे, नप क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना ची अंमलबजावणी करण्यात यावी, उद्याने निर्माण करण्यात यावे, शहरातील मुख्य मार्गावर शौचालय बांधकाम करण्यात यावे, नपमध्ये आकृतीबद्ध कर्मचारी नियुक्ती ची अंमलबजावनी करण्यात यावी, नप ला रुग्णवाहिका देण्यात यावी,ग्राम पंचायत काळातील सफाई कामगार नप सेवेत सामावून घेण्यात यावे, मरावीवीम कडून शेतकऱ्यांना पूर्णवेळ विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात यावे या मागण्याचे निवेदन शहर कांग्रेस कमीटी अध्यक्ष अविनाश अगडे व मीडिया प्रमुख पप्पू शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .

निवेदन देत असतांना शहर कांग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख, माजी नप सभापती तथा शहर कांग्रेसचे सहसचिव नितीन कटारे , शहर कांग्रेसचे महासचिव विनोद सातपुते, तालुका कांग्रेसचे उपाध्यक्ष राजू चौधरी , तालुका कांग्रेसचे सचिव विजय डाबरे, शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष गुरुदास जुणघरे ,शहर संपर्क प्रमुख धनराजजी मालके, तालुका कांग्रेसचे सहसचिव नागेश चटे, तालुका कांग्रेसचे सरचिटणीस विलास मोहिणकर, योगेश अगडे आदी उपस्थित होते.

या समस्यांचे निवेदन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार जीप गट नेते तथा चिमूर विधानसभा कांग्रेस समनव्यक डॉ सतीश वारजूकर, जिल्हाधिकारी, एसडीओ चिमूर, मुख्यधिक्कारी चिमूर यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here