




✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे,)मो:-9075913114
गेवराई(दि.३डिसेंबर):-हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या निमित्ताने गेवराई तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत कार्यालय च्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने गावातील अपंग व्यकतींचा सन्मान करण्यात आला तसेच अपंगांसाठी शासकीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनेची माहिती देण्यात आली.
यावेळी देवपिंप्री ग्रामपंचायत चे सरपंच श्री. शिवनाथ गवारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की. अपंगांच्या प्रत्येक समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करिल व अपंगाना गावात फिरत असताना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता देवपिंप्री ग्रामपंचायत कार्यालय कडून घेण्यात येईल.
सरपंच म्हणाले की, आपण फक्त शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत. आपली मानसिकता व विचार अपंग नाहीत. आपण स्वतः ला अपंग समजू नये, जो मनुष्य आपल्या कमतरतेला घाबरून आत्मविश्वास गमावून गुडघे टेकून रडत बसतो त्याला कुणाही उभे करू शकत नाही, जो आपल्या कमतरतेला आपली ताकद बनवतो व आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतो त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही. असे मनोगत देवपिंप्री ग्रामपंचायत चे सरपंच शिवनाथ गवारे यांनी केले आहे,
त्याप्रसंगी सरपंच शिवनाथ गवारे, ग्रामपंचायत चे संगणक परिचालक श्री, सुदर्शन गवारे, प्रहार MSEB राज्य कार्य सदस्य श्री, अंकुश सोनवणे, सर्कल प्रमुख श्री, वचिष्ट गवारे, सर्कल उपप्रमुख, श्री, अर्जुन गवारे, अपंग सदस्य श्री, प्रकाश नाटकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते




