Home महाराष्ट्र महावितरणच्या बेबंदशाहीला वेसण घालण्यासाठी शेतकरी वीज ग्राहकांनो एकजुटीने लढा द्या- प्रतापराव होगाडे,...

महावितरणच्या बेबंदशाहीला वेसण घालण्यासाठी शेतकरी वीज ग्राहकांनो एकजुटीने लढा द्या- प्रतापराव होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

376

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.3डिसेंबर):- महावितरण कडून शेतकऱ्यांकडील तथाकथित थकीत वीज बिल वसुली साठी वीज पुरवठा बंद करण्याच्या कारवाई बद्दल, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष मा प्रतापराव होगाडे यांनी संपूर्ण तपशीलवार पुराव्यानिशी सत्यता जाहीर करून महावितरणच्या गैरकृत्याबद्दल राज्यव्यापी दौऱ्यात केवळ आपल्या विभागाचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा किळसवाणा खेळ महावितरण करीत आहे. त्याकरिता शेतकरी वीज ग्राहकांनी जागृत होऊन हे षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहन श्री होगाडे यांनी केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात शेती वीज बिल वसुली साठी महावितरणकडून वीज जोडण्या नव्हे तर कृषी रोहीत्रेच बंद करून ठोकशाहीने अघोरीं कार्यक्रम सुरु आहे. एकीकडे कोरोना मुळे बिघडलेली आर्थिक घडी अन त्यात महावितरण ची ही शेती बिल वसुली मोहीम यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.

आजी व माजी राज्यकर्ते मात्र शेतकऱ्यांची व्यथा योग्य मार्गाने जाणून घेण्याऐवजी फक्त शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करीत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने शेतकऱ्यांना शेती वीज बिल यामधील नेमकी सत्यता काय आणि खरंच शेतकरी महावितरणचा देण लागतो का? प्रत्यक्ष शेती विजेचा वापर किती कमी आहे आणि महावितरण मात्र तो वीज वापर अवाढव्य दाखवून मुळ वापरलेल्या विजेची दुप्पट तिप्पट नव्हेतर त्यापेक्षाही जास्त रक्कम शासनाकडून अनुदानापोटी व इतर वीज ग्राहकांकडून क्रॉस सबसिडी द्वारे वसुल करत आहे. ही सर्व लूट करूनही वरून शेतकऱ्यांनाच बदनाम करून शेती वीज बिलापोटी त्यांचा वीज पुरवठा खंडित करत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने शेतकरी वीज ग्राहक जागृती अभियानाचा झंझावात राज्य भर सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेने अकोला येथे दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी अकोला जिल्हा मराठा मंडळ येथील सभागृहात शेतकरी वीज ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता.

सदर मेळाव्यात महावितरण ची शेती वीज बिल थकबाकी केवळ थोतांड असून त्यापोटी वसुल केलेले अनुदान कितीतरी पटीने जास्त आहे.त्यामुळे शेतकरी महावितरणचे देणे लागतंच नाहीत उलट महावितरणच शेतकऱ्यांची देणे लागते, हे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी पुराव्यानिशी शेकडो शेतकऱ्याच्या उपस्थितीत पटवून दिले. यासोबत शेतकऱ्यांनी कायदेशीर तरतुदी यांचा कसा वापर करावा हेही मार्गदर्शन केले. ह्या शेतकरी मेळाव्यास किसनब्रिगेड चे संस्थापक प्रकाशजी पोहरे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची समयोचित भाषणे झाली. श्री होगाडे यांनी महावितरणचे हे कट कारस्थान उधळून लावण्यासाठी जागृत होणे नितांत गरजेचे असून त्यासाठी संघटनेची नेहमी सहकार्याची भूमिका असते व राहील असे प्रतिपादन केले.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, बहुसंख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत महावितरण चे वीज बिल किती खोटे व चुकीचे आहे. शेती वीज वापर वास्तविकतेपेक्षा अवाढव्य दाखवून शासकीय अनुदान कसे लाटल्या जाते आणि शेतकऱ्यांचे महावितरण ला काहीही देण लागत नसतांनाही शेतकऱ्यांची तथाकथित थकीत वीज बिल दाखवून त्याची कशी बदनामी केल्या जात आहे यांचा पुनरुच्चार केला. सदर पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे, राज्य सचिव आशिषजी चंदाराणा, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे आणि अकोला येथील विद्युत वितरण समिती सदस्य किशोर मानकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here