Home महाराष्ट्र परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य, शाळांबाबतही अजित पवारांचं मोठं वक्तव्य

परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य, शाळांबाबतही अजित पवारांचं मोठं वक्तव्य

100

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2डिसेंबर):-परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (AJIT PAWAR) सांगितलं आहे.

ओमिक्रॉनच्या बाबतीत आपण अधिक काळजी घ्यायला हवी, असं ते म्हणाले. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य करण्यात आली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असंही अजित पवार म्हणाले. शाळांच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा झाली.

आमची यावर चर्चा झाली होती, त्यावेळी हा नवा विषाणू नव्हता. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा आहे. आता शिक्षणमंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितलं. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित
महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी केंद्राशी चर्चा करु, असंही ते म्हणाले

Previous articleरस्त्यासाठी शेतकरी कुटुंबासह बसले शेतात उपोषणाला
Next articleजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार : मा. आ. अमरसिंह पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here