




🔸नागरी सुविधांच्या कामांकरिता २ कोटी ९३ लक्ष ९८८ रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान !
🔹भापकी, पाळसोना, हातुर्णा पुनर्वसन गावांना मिळणार दिलासा !
✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.2डिसेंबर):- विधानसभा मतदार संघातील वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातूर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन नागरी सोई सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे रेटून धरली त्यामुळे वरुड तालुक्यातील 1991 मधील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पुनर्वसन करतांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा देण्याबाबतच्या कामांबाबत सुधारित परिपूर्ण प्रस्ताव दोन महिन्यांचा कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने सादर करावेत, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते .
वरुड तालुक्यातील भापकी पाळसोना हातुर्णा येथील पुनर्वसन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव नायक, उपायुक्त बावणे यांच्या उपस्थितीत पुनर्वसित गावातील नागरी सुविधा कामांची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भापकी, पाळसोना, हातुर्णा या गावांचा पाहणी दौरा करून गाव अंतर्गत रस्ते, पान्याच्या टाक्या, वीज कनेक्शन, पेव्हर ब्लॉक, तार कुंपण, पाण्याच्या पूरक पाईप लाईन, हँडपम्प इ कामांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याच्यासूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.
हातूर्णा, भापकी, पळसवाडा पुरपीडित गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या निधी साठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कोरोना काळात वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले असून १ डिसेंबर रोजी मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव नायक यांनी विजेच्या कामासाठी तसेच नळ पाणी पुरवठा कामासाठी २ कोटी ९३ लक्ष ९८८ रुपयांचा निधी मंजूर करून शासन निर्णय निर्गमित करून आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
त्यामध्ये हातूर्णा येथे वीज पुरवठा करणे करीता ४२ लक्ष २ हजार ८४६ रुपये, भापकी वीज पुरवठा करणे २४ लक्ष ५३ हजार ९६२ रुपये, पळसवाडा येथे वीज पुरवठा करणे ३४ लक्ष ७० हजार १८० रुपये, हातुर्णा नळ पाणी पुरवठा करणे करीता ५० लक्ष ५३ हजार रुपये, भापकी येथे नळ पाणी पुरवठा करणे ७५ लक्ष ७८ हजार २०० रुपये, पळसवाडा येथे नळ पाणी पुरवठा करणे ६३ लक्ष ४२ हजार ८०० रुपये या नागरी सुविधांच्या कामांकरिता २ कोटी ९३ लक्ष ९८८ रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.




