



🔺तपोभूमी गुंफा गोंदेडा येथील घटना
✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)
नेरी(दि.2डिसेंबर):-येथून जवळ असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गुंफा गोंदेडा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोशाळेतील दोन गायींना काल दि 30 नोव्हे ला रात्री गोशाळेची सरंक्षण भिंत तोडून दोन गायींवर हल्ला चढवला यात दोन्ही गायी जागेवर ठार झाल्या.गोंदेडा गुंफा हा परिसर जंगल व्याप्त परिसर असून व्याघ्रप्रकल्प ताडोबा जंगलाला लागून असलेला जंगली परिसर आहे या भागात नेहमीच वाघाचा वावर असून दहशत आहे आणि याच ठिकाणी तपोभूमी मध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोशाळा सर्वात मोठी गोशाळा असून इथे मोट्या संख्येनी गायी गोरे आणि कालवड आहेत काल रात्री याच परिसरात पट्टेदार मोटा वाघ दबा धरून बसला होता.
गोशाळेच्या सभोवताल एक संरक्षण भिंत आहे आणि आतमध्ये गायीना गोटा आहे गायी ह्या आतमध्ये गोट्यात असताना दोन गायी सवरक्षण भिंतीच्या आतमध्ये बसल्या होत्या त्यांना बघताच वाघाने संरक्षण भीत फोडून गायींवर हमला केला यात एक गाय ठार केली तिला ओढत बाहेर नेण्याचे वाघाने प्रयत्न केले परंतु त्याला गाय ही मोठी असल्यामुळे नेता आली नाही तेव्हा त्याने पळणाऱ्या दुसऱ्या गायींवर हल्ला करून तिलाही ठार केले परंतु त्या गायींना संरक्षण भिंत असल्यामुळे नेता आले नाही त्यामुळे वाघ निघून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला त्यानंतर सकाळी गोशाळेचे कर्मचारी गोशाळेत गेले असता त्यांना हा प्रकार दिसला असता त्यांनी तात्काळ वनविभाग नेरी येथील वनपरिक्षेत्र क्षेत्रासाहयक रासेकर याना कळविताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत गायीचा पंचनामा केला आणि वाघावर पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले सदर गायीचे वनविभागा मार्फत नुकसानभरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.


