Home महाराष्ट्र हंबर्डे महाविद्यालयात एड्स प्रतिबंधक मार्गदर्शक शिबिर संपन्न

हंबर्डे महाविद्यालयात एड्स प्रतिबंधक मार्गदर्शक शिबिर संपन्न

63

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.2डिसेंबर):- तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथे संस्था अध्यक्ष किशोर हंबर्डे व सचिव अतूलकूमार मेहेर,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालय आष्टी एड्स समुपदेशन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स प्रतिबंधक जनजागृती शिबिर जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने संपन्न झाले.

यावेळी ग्रामीण रूग्णालय आष्टी येथील एड्स समुपदेशन केंद्राचे प्रयोगशाळा अधिक्षक जयचंद नेलवाडे व एड्स समुपदेशक सुजाता दहिफळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे हे होते.यावेळी विद्यार्थी संसद प्रभारी प्रा.पठाण सर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रवी सातभाई,डॉ.सुहास गोपणे,प्रा.महेंद्र वैरागे,समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.मुंढे,इतिहास विभाग प्रमुख डॉ.सखाराम वांढरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here