Home महाराष्ट्र धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील पहेलवान अक्षय सोनवणे याने मिळविले कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील पहेलवान अक्षय सोनवणे याने मिळविले कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

292

🔹आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जळगावचा युवक होणार सहभागी : गोवा येथे मिळविले सुवर्ण

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.1डिसेंबर):-जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु.येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेस्टलिंग अंड पैक्रेषन चैम्पियनशिप २०२१ हि स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली.

जागतिक स्तरावरील या स्पर्धेत सुवर्ण मिळविल्यानंतर अक्षयची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली आहे. १६ डिसेंबर रोजी विदेशात फ्रीलेंड या ठिकाणी जागतिक स्तरावरील पुढील स्पर्धा होणार आहे. त्यात तो सहभागी होणार आहे. त्यासाठी त्याला तत्काळ स्वरुपात पासपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

अक्षयची निवड झाल्याबद्दल त्याच्या गावी त्याचा सत्कार करण्यात आला असून पुढील स्पर्धेसाठी त्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रसंगी एन.एस.जी कमांडो शैलेश पाटील, सुतार जनजागृती संस्थेचे अध्यक्ष धनंजय रुले, लिलाधर पाटील, समस्त बांभोरी मित्र परिवार, बी.के.बॉईज बांभोरी यांनी त्याचे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यास चोपडा येथील एम.जी.महाविद्यालयाचे प्राध्यापक आर.आर.पाटील, पवार सर, सूर्यवंशी सर यांचे सहकार्य लाभले.

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील युवक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव झळकवणार असल्याने सर्वाना आनंद व्यक्त होत आहे तर अक्षय ने फ्रीलेंड येथे होणाऱ्या स्पर्धेत जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Previous articleनवीन शिक्षण धोरण 2020 च्या विरोधात सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन
Next articleभगवान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here