Home महाराष्ट्र नवीन शिक्षण धोरण 2020 च्या विरोधात सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण हक्क परिषदेचे...

नवीन शिक्षण धोरण 2020 च्या विरोधात सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन

136

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.1डिसेंबर):-येल्लापूर येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शिक्षण हक्क परिषदेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना चंद्रपूरचे सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष धीराजभाऊ तेलंग यांनी विध्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवर सरकारवर निशाणा साधला .

विध्यार्थाना तुटपुंजी स्कॉलरशिप देऊन ते हि दोन दोन वर्ष लांबणीवर घालून सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे असे मत मांडून .
जर ह्या समस्येवर उपाययोजना करून घ्याची असेल तर .
पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्याप्रमाणे आंदोलन तीव्र करून नवीन शिक्षण पॉलीसिचा विरोध विद्यार्थ्यांनी संघटितपणे करावा असे विचार मांडले . विद्यार्थ्यांचे कॉलरशिप अडवून त्यांचा टाईपण बंद करून त्यांच्या शाळेच्या सुविधा थांबवून त्यांना बेरोजगार व आत्महत्या करण्यास विद्यार्थ्यांना मजबूर करण्याचे षड्यंत्र सरकार करत आहे
आणि सम्यक तर्फे स्कॉलरशिपच्या प्रस्नासाठी जिवातीतील आचारसंहितेनंतर जिवतीत आंदोलन करण्याचा इशारा दिला .

तर शिक्षण हक्क परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात संभाजी ढगे यांनी सुद्धा शिक्षण व्यवस्था व बेसुमार वाढलेल्या कॉलेज व शाळांच्या फी वर सवाल उपस्थित केले .तर सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष प्रकाश जोंधळे यांनी सम्यकची जिवती तालूक्यातील सम्यक च्या पुढील वाटचालीसंधार्बत मार्गदर्शन करून जिवती तालुक्यातील सम्यकची टीम नेहमी विध्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर त्याच्या मागे ठाम पणे उभी राहील व विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा पर्यंत करेल असे आसवाश्यन दिल .

तर कार्यक्राचे सूत्रसंचालन शुद्धोधन निखाडे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन .येल्लापूर सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे ग्राम अध्यक्ष प्रेमकांत कांबळे .व संघटक दशरत गायकवाड व सदस्य शुद्धोधन बनसोडे,राजरत्न वागवसे,प्रवीण कांबळे ,शुद्धोधन चंदनखेडे,प्रफुल कांबळे,प्रशिक कांबळे, शेषराव कांबळे सम्यक जीवने इत्यादी विद्यार्थ्यांनी केले .तर आभार प्रदर्शन अमोल कांबळे यांनी केले व कर्यक्रमाची सांगता झाली .व रात्री संभाजी ढगे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद सोनकांबळे व नम्रता आत्माराम सावंत पंचशील मंडळ येल्लापूर यांच्या गायनाचा कार्यक्रम सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या नियोजनातून घडवून आणला.

या संपूर्ण कार्यक्रमाला गावातील लोकांनी चांगले प्रतिसाद दिले .व शेकडो विध्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते .

Previous articleमुबई कोस्टल रोड – रस्ता की पूल?
Next articleधरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील पहेलवान अक्षय सोनवणे याने मिळविले कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here