Home Breaking News नात्याला काळिमा; रक्ताचं नातं विसरून लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांनी केला बलात्कार

नात्याला काळिमा; रक्ताचं नातं विसरून लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांनी केला बलात्कार

154

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.1डिसेंबर):- अल्पवयीन असलेल्या आपल्या सख्ख्या लहान बहिणीवर सख्ख्या भावासह चुलत भावाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तसेच गावातीलच एकाने तिचा विनयभंगही केला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर रात्रीच्या सुमारास बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील एका गावात १६ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितले. नंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखविल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले. हा प्रकार पीडितेच्या वडिलांना सांगण्यात आला. पीडितेला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपलाच सख्ख्या व चुलत भावाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन भावांसह गावातील १९ वर्षीय युवकाविरोधात फिर्याद दिली.

याप्रकरणी दोघांविरोधात अत्याचार तर एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील विनयभंग करणाऱ्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दोन अल्पवयीन मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here