Home महाराष्ट्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांनी सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घ्यावा — आमदार देवेंद्र...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांनी सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घ्यावा — आमदार देवेंद्र भुयार

89

🔸कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना मिळणार 50 हजार !

🔹मोर्शी, वरुड, शेघाट येथील कार्यालयात नोंदणी करण्याचे आ. देवेंद्र भुयार यांनी केले आवाहन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.1डिसेंबर):-कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले असून लाखो कुटुंबियांनी कर्ता, कमविता व्यक्ती गमावला आहे. कोणी आई, वडील कोणी मुलगा, मुलगी गमावली आहे. अनेक लहान मुले तर पोरकी झाली आहेत. यामुळे या कुटुंबियांसमोर आता भविष्याचे संकट उभे ठाकले आहे अश्या या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उप मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पावर यांच्याकडे केली होती.कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. या मदतीपासून मोर्शी वरुड तालुक्यातील एकही कुटुंब सुटू नये याची काळजीही आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली असून कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते, त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे. अशा व्यक्तींचा मृत्यू चाचण्यांमधून झाल्याचेही निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद असते. एखाद्या रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी या योजनेंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला लाभ देण्यात येणार आहे. कोविड १९ च्या प्रकरणात मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड १९ मुळे झाला आहे असे समजण्यात येणार आहे. याकरिता तांत्रिक अडचण उद्भवल्यास आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन कार्यालय वरुड, कामगार भवन मोर्शी, लोकसेवा भवन शेघाट या कार्यालयाशी संपर्क साधून या कार्यालयांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्याय येणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली .
अर्ज दाखल करताना वारसाने किंवा नातेवाइकाने अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, बँक तपशील व मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र व इतर निकट नातेवाइकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रकरण संगणकीय प्रणालीद्वारे स्वीकृत होणार आहे.

यासाठी वेब पोर्टलवर माहितीसह प्रस्ताव सादर करायचा असून माझ्या मोर्शी, वरुड, शेघाट येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना दिलासा मिळणार आहे. — आमदार देवेंद्र भुयार

Previous articleकामातून सेवा निवृत्त व्हा पण समाज व घरातुन नाही!
Next articleनात्याला काळिमा; रक्ताचं नातं विसरून लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांनी केला बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here