




✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.1डिसेंबर):-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरच्या वतीने जिल्हा ग्राहक पंचायत बैठक नुकतीच श्रीहरी बालाजी मंदिरात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक डॉ. अनिलपंत भार्गव, प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्हा सचिव पुरुषोत्तम मत्ते, अध्यक्ष वसंतराव व-हाटे, वामनराव नामपल्लीवार, वसंतराव मिसार, शेखर घुमे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरचे माजी तालुका संघटक सदाशिव सुकारे पाटील यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरचे अध्यक्ष प्रा. राम चिचपाले यांनी शाखेचा अहवालाचे वाचन केले. उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूर जिल्ह्यात तसेच चिमूर तालुक्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्य वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले. यावेळी प्राप्त तक्रारी व निकाली निघालेल्या तक्रारीचे वाचन करण्यात आले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरचे अध्यक्ष प्रा. राम चिचपाले, उपस्थितांचे आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरचे सचिव सुखदेव ढोणे यांनी मानले. कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चिमूरचे नत्थूजी झोडे, कुसुमराव कडवे, भैय्या कारेकार, साधनाताई शिरभैये, बालाजी दांडेकर, रामदास कामडी, राजेश्वर हिंगे, विठ्ठल इंगळे, भक्तदास जीवतोडे, छाया दांडेकर, केशव मेश्राम, गोपीचंद कांबळे, गुलाब लोणारे, अशोक शेंडे, पत्रकार प्रवीण चिमूरकर, विजय घरत, लक्ष्मन वनकर, भरत नागोसे आदीने मोलाचे सहकार्य केले.




