Home महाराष्ट्र नंदकुमार काटकर यांनी “इतर सहकारी संस्था” मतदार संघातून उमेदवारी अर्ज केला दाखल

नंदकुमार काटकर यांनी “इतर सहकारी संस्था” मतदार संघातून उमेदवारी अर्ज केला दाखल

85

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.1डिसेंबर):-मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनल च्या माध्यमातून सहकारातून बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी, मार्गदर्शन करणारे बेरोजगार संस्थांचे मार्गदर्शक श्री.नंदकुमार काटकर यांनी “इतर सहकारी संस्था” मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यावेळी ज्येष्ठ संचालक मा.शिवाजीराव नलावडे, मा. सिद्धार्थ कांबळे, मा. संदीप घनदाट, मा.विनोद बोरसे, बृहन्मुंबई बेरोजगार संस्थांचे फेडरेशन अध्यक्ष श्री. जयंत शिरिषकर, स्मिता अंजिर्लेकर, पश्चिम उपनगरे बेरोजगार संस्थांचे फेडरेशन अध्यक्ष श्री. प्रकाश सोसे, पूर्व उपनगरे बेरोजगार संस्थांचे फेडरेशन अध्यक्ष श्री. विजय केदारे, सचिव ॲड. प्रमोद तायडे, संचालक अविनाश पाटील आणि ॲड. चंद्रकांत खर्डे, मुंबई शहर बेरोजगार संस्थांचे फेडरेशन अध्यक्ष श्री. बाळासाहेब घाडगे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here