



🔹अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश
✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)
गोंडपीपरी(दि.30नोव्हेंबर):- तालुका गोंडपीपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. नितीन भटारकर,कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,श्री.महेंद्रसिंग चंदेल जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर,श्री.सुनील दहेगावकार राष्ट्रवादी सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष,श्री.सुरेश रामगुंडे ओबीसी सेल प्रदेश सरचिटनिस, श्री.शरद मानकर राष्ट्रवादी तालुका निरीक्षक गोंडपीपरी, डाँ.आनंद अडबाले जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे कार्यकारी अध्यक्ष, श्री.नितेश मेश्राम कार्याध्यक्ष तालुका गोंडपीपरी,श्री.पुरुषोत्तम वाघ मामा जेष्ठ नेते, श्री.कुणाल गायकवाड राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष, श्री.दामोदर गरपल्लीवार, गरपलीवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारी अध्यक्ष गोंडपीपरी ,ऍड.मंगेश काळे, नागोसे युवक अध्यक्ष गोंडपीपरी, मनोज धानोरकर माजी तालुका अध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितेश मेश्राम यांनी केले, अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.


