Home महाराष्ट्र देवपूर व मुसळगाव जि, प, गटाची प्रहार पक्षाची बैठक संपन्न

देवपूर व मुसळगाव जि, प, गटाची प्रहार पक्षाची बैठक संपन्न

53

🔹जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार

🔸आता थांबायचं नाही लढायच आणि जिंकायच!-शरद तुकाराम शिंदे पाटील 

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.30नोव्हेंबर):-सिन्नर तालुक्यातील देवपूर व मुसळगाव जिल्हा परिषदव पंचायत समिती गट कोण जिंकल कोण हरल याचा विचार करायचा नाही. आमच्या मुळे कोणी पडत असेल असे जर त्यांना वाटत असेल त्यांनी आपल्यासाठी थांबावे. आत्ता आपण थांबायचं नाही. आज पर्यंत आपण त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जनतेच्या आग्रहास्तव थांबतच आलो. विधानसभेला जनतेच्या आग्राहस्तव मी थांबलो म्हणून ते हजार-पंधराशे जिंकले .आज पर्यंत आपण त्यांचा विचार केला आता त्यांनी आपला विचार करावा. आपण पक्ष उभे केले आपण त्यांना साथ दिली माघार घेतली म्हणून ते जिंकले . आपण आघाडीत आहोत अस कुणी म्हणत असेल तर आपण कोणाही बरोबर वेळ आली तर युतीही करू.

राष्ट्रवादी नाहीतर शिवसेना नाहीतर तिसरी आघाडी नाहीतर स्वबळावर भिडायच. आता थांबायचं नाही लढण्याचा पक्का निर्धार .दोन दिवसापूर्वी ठाणगाव व नायगाव गटाच्या बैठका झाल्या. तेथील कार्यकर्त्यांचाही हाच निर्णय . पुढील दोन दिवसांनी वावी नांदुर-शिंगोटे व चास दापुर गटाची बैठक होणार – सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका जागा लढवण्याचा प्रहार पक्षाचा निर्धार आमदार बच्चुभाऊ कडू यांचा प्रचार सभा होणार असल्याचे तालुका अध्यक्ष शरद तुकाराम शिंदे पाटील यांनी केले

परखड मार्गदर्शन यावेळी बैठकीत शरद तुकाराम शिंदे तालुकाध्यक्ष सह शिवाजी गुंजाळ,संदीप लोंढे युवाध्यक्ष, संजय कदम उपाध्यक्ष नंदू महाराज ,राजु सोनवणे,दीपक पगार ,ज्ञानेश्वर चासकर,लोणारे महाराज,धोक्रट महाराज,राहुल रुपवते,संतोष सिरसाट, समाधान गवांदे,सुरेश गवांदे, संदीप गवांदे, भास्कर उगले,सुरेश सानप,रतन जाधव,दौलत खुळे,शरद गवांदे , दिनकर गडाख,बाजीराव थोरात, अभय पेटारे,राजु भवर,गणपत नाठे,हिरामण माळी,संभाजी सिरसाट, प्रकाश थोरात,शुभम गवांदे,तुकाराम सिरसाट,दत्ता नाजगड,यश कुराडे, जयराम जाधव, वैभव कोकाटे ,बाबासाहेब गवांदे , सखाराम गुरुळे,योगेश कोकाटे,राजाराम चव्हाणके,मुक्ता चव्हाणके, सुरेश खुळे,आप्पा खुळे,दादा नाठे, सोनु मिठे, हिरामण पाचोरे,राजु शिंदे, गणा सांगळे,संपत आव्हाड,पंढरी सोनवणे,दत्ता पडवळ,चिंधु गुंजाळ,राजु साळवे सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here