Home महाराष्ट्र शौचास गेलेल्‍या युवकाचा विजेच्या धक्‍क्याने मृत्‍यू

शौचास गेलेल्‍या युवकाचा विजेच्या धक्‍क्याने मृत्‍यू

104

🔺गेवराई तालुक्यातील दुदैवी घटना

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.30नोव्हेंबर):-शौचालयाला गेलेल्या युवकाचा उघड्या रोहित्र्याच्या विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावरगाव येथील माजी सरपंच असलेले अण्णाभाऊ जाधवर यांचा मुलगा दत्तू आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास शौचालयाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला.

त्‍यानंतर तो परतून येत असताना त्याचा उघड्यावरील विद्युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाल्‍याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्‍थळी उघड्या रोहित्र्याचे फ्युज, वायर, आर्थिंग वायर सर्व उघडे असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे विद्युत तारेचा स्‍पर्श होवून दत्तू जाधवर यांचा मृत्‍यू झाल्‍याची चर्चा सुरू आहे. या प्रकाराची माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. त्‍यांनी घटनेचा पंचनामा केला. त्‍यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या घटनेमुळे सर्व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here