Home महाराष्ट्र चीता यज्ञेश शेट्टी यांना संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते ’12 व्या महाराष्ट्र...

चीता यज्ञेश शेट्टी यांना संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते ’12 व्या महाराष्ट्र प्रेस्टीजियस रत्न अवॉर्ड -2021′ ने सन्मानित

86

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.30नोव्हेंबर):- रंगशारदा सभागृह, मुंबई येथे ‘आप की आवाज फाउंडेशन’चे अध्यक्ष अंजन व्ही गोस्वामी यांनी ’12वा महाराष्ट्र प्रेस्टीजियस रत्न अवॉर्ड -2021’ आयोजित केला होता. यावेळी बॉलीवूडचे प्रसिद्ध फरहान अख्तर ट्रेनर आणि कोरिओग्राफर चीता यज्ञेश शेट्टी यांना प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन आणि अंजन व्ही गोस्वामी यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट ऍक्शन ट्रेनर आणि कोरिओग्राफर’साठी ’12 व्या महाराष्ट्र प्रेस्टीजियस रत्न अवॉर्ड – 2021’ ने सन्मानित करण्यात आले.

यज्ञेश शेट्टी यांनी मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रात अनेक प्रशंसनीय कामे केली आहेत. यावेळी यज्ञेश शेट्टी यांनी संस्थेचे अध्यक्ष अंजन व्ही गोस्वामी यांचे आभार मानले व यशासाठी शुभेच्छा दिल्या. चित्रपटसृष्टीत चीता यज्ञेश शेट्टी यांनी अमिताभ बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार, हृतिक रोशन, गोविंदा, प्रियांका चोप्रा, ईशा कोप्पीकर, करिश्मा कपूर, जुही चावला,फरहान अख्तर यांच्यासह १८० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री आणि सुपरस्टार्सना मार्शल आर्ट शिकवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here