Home महाराष्ट्र अन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टाॅलवर..

अन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टाॅलवर..

72

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.30नोव्हेंबर):-राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच ‘लोकनेता’ उपाधी मिळते, अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला.झाले असे की, पंकजाताई मुंडे रविवारी सायंकाळी औरंगाबादहून परळीकडे जात होत्या, बीडमध्ये दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्या पार्श्वभूमी कार्यालयात गेल्या होत्या.

पंकजाताई बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला.पंकजाताईंनी त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचीच आठवण आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here