Home महाराष्ट्र अंबाडा येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाला मोठा प्रतिसाद !

अंबाडा येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाला मोठा प्रतिसाद !

306

🔹आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून शेकडो तक्रारींचा निपटारा

🔸जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी राबविला अभिनव उपक्रम !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.29नोव्हेंबर):-सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून होत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी आमदार आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली असून मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे आमदार आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार , उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले , तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, पंचायत समिती गट विकास अधिकारी रवींद्र पवार, कृषी अधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, सरपंच रुपाली कडू, जी प सदस्य सारंग खोडस्कर, विपुल हिवसे, हितेश साबळे, पंकज शेळके, अमोल कडू, मोहन राजस, प्रफुल चिखले , ग्राम पंचायत सदस्य, यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, सर्वसामान्यांचे महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे एकाच ठिकाणी तत्काळ होण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यापुढे असाच उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात येत आहे.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. आमदार देवेंद्र भुयार यांच्या आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे आमदार देवेंद्र भुयार व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

श्रावणबाळ , संजय गांधी निराधार योजना , महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण, परिवहन विभाग, आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले . आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्ड , जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड , पोखरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना ,यासह विविध विभागाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अमोल कडू, अज्जू सौदागर, रवींद्र कोकरे, गजु धुर्वे, सैफउद्दीन, नितीन मरसकोल्हे, गोलू जयस्वाल, चंदू , प्रेमराज राठोड, अनिल चढोकर, सतीश टेकाम, शैलेश झाडे, बाळा दुबळे, सचिन भेले, रामदास धुर्वे, गोविंद उईके, विजय चुनडे, प्रवीण मेश्राम, नामदेव गडलिंगे, प्रकाश आजनकार, विजय सितकारे, रामकृष्ण उईके, सुरेश भालावी, रमाकांत कोंडे, जितेंद्र धडसे, शशिकांत सौदागर, रामभाऊ पानसे, विजय कवडेती, रवी युवनाते, रोशन कापसे, यांच्यासह आदि मंडळींनी परिश्रम घेतले.

Previous articleपंढरपूर तालुका मराठी अध्यापक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
Next articleयशोमती ठाकूरांना उध्वस्त करण्यासाठी अमरावतीत दंगल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here