



✒️खर्डी प्रतिनिधी(अमोल कुलकर्णी)
खर्डी(दि.29नोव्हेंबर):-हाराष्ट्राची मातृभाषा म्हणून मान्यता असणाऱ्या “माय मराठी” बोली भाषेचेचे अनेक प्रकार आपल्या महाराष्ट्रात दिसून येतात.प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय,महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या साहित्यिक मराठी भाषेचे अध्यापक मंडळ राज्यभरात कार्यरत आहे.भाषाशास्त्रातील नवनवीन कल्पना साहित्य आणि विकास याबाबत सातत्याने चर्चासत्रे,सभा, वैचारिक मंथन बैठका पार पडत असतात.शासन स्तरावरून देखील मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आलेला आहे.मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचे राज्यभर संघटन आहे. सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाच्या कक्षेत येणाऱ्या पंढरपूर तालुका मराठी अध्यापक मंडळाची सहविचार सभा रविवारी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती च्या कार्यालयात पार पडली.विविध विषयवार चर्चा झाली.
नाशिक येथील साहित्य संमेलन तसेच आगामी काही शिबिरे घेण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली ती खालील प्रमाणे पंढरपूर तालुका अध्यक्षपदी-शिवाजी कौलगे, उपाध्यक्ष -सौ.अनिता भोसले, कार्याध्यक्ष -बाळू मुलाणी, सचिव -शिवाजी नागणे, खजिनदार -सौ.विभावरी डूबल,प्रसिद्धीप्रमुख -अमोल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी राजेंद्र आसबे, बाळासाहेब चव्हाण,शिवाजी चव्हाण,म्हेत्रे मॅडम, वैशाली गोसावी,महादेव झुरळे,शरद भिंगारे,रावसाहेब जाधव सुनिल इंगळे व सुनिल रूपनर या सर्वांच्या कार्यकारिणीत नेमणुका करण्यात आल्या आहेत.


