



✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.29नोव्हेंबर):-ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने काल नियमावली सादर केली असून कोरोनासह नवीन आलेला ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. हेच सांगण्यासाठी आता थेट बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे गल्लीबोळात जावुन लसीकरणाचे महत्व सांगण्याबरोबर नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन आढावा घेत आहेत. आज दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी शहरातील मोमीनपुरा भागात गेले आणि त्याठिकाणी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी टिळेकर, तहसीलदार डोके यांच्यासह माजी सभापती खुर्शीद आलम हे उपस्थित होते.
दरम्यान, यानंतर जिल्हाधिकारी यांनी गेवराई शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन तेथील लसीकरणाचा आढावा घेतला. कोरोनाचा फास कमी होत असताना जगाच्या पाठिवर ओमिक्रॉनचा धोका वाढला. तसे महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनता ओमिक्रॉनच्या विळख्यात येऊ नये.
यासाठी आधीच उपाययोजना करायला सुरुवात केली. काल राज्य शासनाने ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नियमावली बनवल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपस्थित नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देणं सुरू केलं.
दरम्यान, लसीकरण करणं नितांत गरजेचं असल्याचे सांगत स्वत:सह परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी लस घ्या, असे उपस्थितांना आवाहन केले.


