




🔸भू-वैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी, ब्रम्हपुरी येथे आयोजन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.29नोव्हेंबर):-इंटरनॅशनल ट्रेडिशनल शितो- रियु कराटे व कुबुडू कराटे असोसिएशन ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी रविवारला “इंटर डोजो विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन अड्याळ टेकडी, ब्रम्हपुरी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.क्रिष्णाभाऊ सहारे(माजी.जि.प.उपाध्यक्ष,चंद्रपूर) आणि डॉ.निलेश खटके सर (तहसीलदार भद्रावती ) यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.गणेश तर्वेकर (उपाध्यक्ष- न.परिषद नागभीड), उपाध्यक्ष म्हणून सुयोगकुमार बाळबुद्धे आणि प्रमुख अतिथी म्हणून स्वप्नील अलगदेवें, उदयकुमार पगाडे, प्रवीण चिमुरकर, सागर कोहडे, रवींद्र तुरनकर, एम.डी.शकील शेख पटेल, पृथ्वीराज कामडी, दत्ता येरावार, पूनम कुथे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातून ह्या कराटे स्पर्धेसाठी आपआपल्या प्रशिक्षक आणि स्पर्धकांसोबत अनेक टीमा सहभागी झालेल्या होत्या. अतिशय रंगतदार कराटे स्पर्धेचे सामने दिवसभर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. वेगवेगळ्या वयोगटातील सहभागी स्पर्धकांची कराटे खेळण्याची शैली, आत्मरक्षण कला आणि संयम ह्या स्पर्धेमध्ये मुख्यतः पाहतांना दिसून आले.
कार्यक्रमाच्या अखेरीस बक्षीस वितरणाला प्रमुख उपस्थिती- सौ.उषा चौधरी मॅडम (तहसीलदार ब्रम्हपुरी), श्री.सुबोध दादा (मुख्य मार्गदर्शक- अड्याळ टेकडी), सिहान- गणेश लांजेवार सर (इंडिया चीफ एक्सामिनर), सिहान- क्रिष्णा डोबले सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ह्या संपूर्ण कराटे स्पर्धेत उत्कृष्ट टीम प्रथम क्रमांकाचे बक्षीस, ब्रम्हपुरी कराटे असोसिएशच्या स्पर्धकांनी पटकाविला, तर द्वितीय क्रमांक वरोरा कराटे असोसिएशन आणि तृतीय क्रमांक वडसा कराटे असोसिएशनने पटकाविला. तसेच उत्कृष्ट कोच आणि उत्कृष्ट रेफरी म्हणून काही निवडक प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री.उदयकुमार पगाडे यांनी केले, तर आभार सिहान- क्रिष्णा डोबले सर यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, ब्रम्हपुरी कराटे असोसिएशनचे सेंसाई- सचिन भानरकर, क्रिष्णा समरीत, प्रितम राऊत, अक्षय कुळे, भूषण आंबोरकर, रोहित पिलारे, वैष्णवी ठेंगरी, मोहिनी भुते, मेघना भूपाल, निलय पातकर, भाग्यवान शास्त्रकार आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था ब्रम्हपुरीच्या सदस्यांनी कठीण परिश्रम केले.




