Home महाराष्ट्र क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा – राॅयल्स युवा मंच महात्मा...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा – राॅयल्स युवा मंच महात्मा फुले चौक अर्हेरनवरगांव यांच्या सौजन्याने…

126

🔸मा. प्रा.नामदेवरावजी जेंगठे सर ब्रम्हपुरी यांचे विशेष मार्गदर्शन…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29 नोव्हेंबर):-28 नोव्हेंबर राष्ट्रपितामह तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन हे शिक्षक दिन म्हणून साजरे करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले हे शिक्षक दिनाचे खरे मानकरी आहेत. कारण की फुलेनी पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेत स्त्री शिक्षण, दीन दुबळ्याना शिक्षण देऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. तसेच स्त्रियांना , दीन दुबळ्याना त्यांच्या शिक्षणाचे खरे हक्क मिळवून दिले.महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने दि. 21 नोव्हेंबर रोजी “ज्ञानज्योती सामान्य ज्ञान स्पर्धा” परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

त्या बद्दल विद्यार्थींना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून रोक रक्कम, ट्राफी, पुस्तक व प्रामाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील प्रथम नागरिक सौ. मा. दामिनीताई जागेश्वर चौधरी यांच्या हस्ते झाले तर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री. मा.प्रा.नामदेवरावजी जेंगठे सर ब्रम्हपुरी यांनी कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित जणांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आणि आपल्या मुलांना शिक्षण द्या व मुलांना चांगले शिकवून सत्यशोधक मार्गाचा अवलंब करा असे समाजाला सांगितले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित श्री. मा. प्रा. लक्ष्मण मेश्राम सर (संचालक इन्स्पायर ॲकेडमी ब्रम्हपुरी) यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण – श्री.मा.ऍड. हेमंतजी उरकुडे ब्रम्हपुरी यांनी केले. तसे प्रमुख अतिथी म्हणून श्री.मा. वामनरावजी मिसार, श्री. अनीलजी मदनकर, श्री. संजयजी ठेंगरे, श्री. दुर्योधन ठेंगरे,श्री. धिरजजी जांभुळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन – श्री.मा. रोशन मदनकार यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन- अमीत मलगम यांनी केले. कार्यक्रमाचे
आयोजन राॅयल्स युवा मंच महत्मा फुले अर्हेरनवरगांव यांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here