



✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)
धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- भारतातील थोर समाज सुधारक शिक्षणतज्ञ सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धरणगाव शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात लहान माळीवाडा समाजमढी येथे प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यानंतर धरणी चौकात महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष निलेश चौधरी, माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, यांनी केले.
नगरसेविका अंजली विसावे, संगीता विनोद माळी, आशा माळी यांच्या हस्ते स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, आर.डी.महाजन, दशरथ महाजन, सचिव गोपाल महाजन, तुळशीराम जाधव, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप माळी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक विलास, महाजन, ललित येवले, सुरेश महाजन, जितेंद्र धनगर , भागवत चौधरी, भालचंद्र जाधव पुनिलाल महाजन, डिगंबर माळी, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, रामा चित्ते, शिरीष बयस, प्रा. जितेंद्र बयस, धिरेंद्र पुरभे, आबा वाघ, नितीश वाघ , गोरख देशमुख, अमोल महाजन, महात्मा फुले ब्रिगेड युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, मंगलेश राजपुत एस. डब्लू, पाटील, राजेंद्र महाजन, कुणाल महाजन, सुखदेव महाजन, सुनील भोई, लक्ष्मण पाटील, नीलेश माळी, जयेश महाजन, नरेंद्र पाटील, विलास माळी, नाना महाराज, सुखदेव महाराज, राजू माळी, पी.डी. पाटील, हेमंत माळी, विनायक माळी, भरत महाजन , भैया महाजन , गोरख देशमुख, मोतीलाल महाजन, अनिल महाजन, रवींद्र बाविस्कर, कांतीलाल . महाजन , कैलास वाघ (सेवक ) इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी आभार सचिव गोपाल महाजन यांनी मानले.


