



✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
दिग्रस(दि.28नोव्हेंबर):- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार ले आऊट येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन पंचशील त्रिशरन घेण्यात आले.प्रास्ताविकचे वाचन आयु.पुरुषोत्तम मेश्राम यांनी केले.प्रा.त्रिपाल राहूलगडे व आयु.चिंतामन मनवर यांनी संविधान या विषयावर प्रबोधन केले.
नतर महिला शहर शाखेच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला परिक्षक म्हणून कु.विना भगत,कु.विमल पंचपुत्रे,कु.जयश्री चौकडे लाभल्या होत्या.कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. विनायक देवतळे, उपाध्यक्ष आयु नंदू गुजर, कोषाध्यक्ष आयु.रमेश वहीले,आयु.तुकाराम उबाळे, सल्लागार आयु.चिंतामन मनवर प्रा.त्रिपाल राहूलगडे, माजी अध्यक्ष देविदास खंदारे, सचिव प्रा. गौतम जयगावकर, संघटक पुरुषोत्तम मेश्राम,आयु.नरेंद्र फुलझेले ,आयु.लताताई भरणे,आयु.बेबीनंदा तुपसुंदरे,आयु.सविता विनकरे,आयु.उबाळेताई,आयु.पुष्पाताई धुळध्वज,आयु.वर्षा वागदे,आयु.तारण्या वागदे आयु.आशा वागदे ,आयु.वंदना फुलझेले इत्यादी उपस्थित होते.सरणताई गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.


