Home महाराष्ट्र आठ दिवसांपासून गावात वीज नाही, शेती करायची कशी? हळहळणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा गळफास...

आठ दिवसांपासून गावात वीज नाही, शेती करायची कशी? हळहळणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

263

🔸गेवराई तालुक्यातील दुदैवी घटनेने हळहळ

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.28नोव्हेंबर):-आठ दिवसापासून गावचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने, पिकं सुकून जात आहेत. या निराशेत तरुण शेतकऱ्यांन टोकाचं पाऊल उचलत, शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे आज घडलीय. कृष्णा राजाभाऊ गायके वय 23 अस आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्यांच नाव आहे. अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महावितरण कडून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे.

हीच वसुली शेतकऱ्याच्या जीवावर उठली आहे. कृष्णा गायके याने आत्महत्या केली नसून महावितरणने त्याचा खून केलाय. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा गायके याने शेतात कांद्याचे बी लागवडीसाठी आणले होते. 8 दिवसापासून शेतातील विहिरीत पाणी असताना देखील इतर पिकाला ही पाणी देता येत नाही. आणि कांदाही लागवड करता येत नाही. यातच अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. याचे अनुदान 3 आणि 2 हजार रुपये खात्यावर जमा झाले. मात्र 7 आणि 8 हजार रुपये वीज बिल आणायचं कोठून ? आठ दिवसात कांदा लागवड नाही केलं तर उत्पन्न हातात येणार नाही. बियाण्यासाठी गुंतवलेले पैसे देखील मिळणार नाहीत. या विवंचनेतून कृष्णाने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

ही आत्महत्या नसून कृष्णा गायकेचा महावितरण ने केलेला खून आहे. अशा घटना थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याची कट केलेले वीज तात्काळ जोडा. अन्यथा गावातील शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अस बंडू गायके यांनी सांगितले. दरम्यान, महावितरण कंपनीमुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. त्यामुळे या महावितरण कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here