Home महाराष्ट्र विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे “संविधान दिन” उत्स्फूर्तपणे साजरा

विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे “संविधान दिन” उत्स्फूर्तपणे साजरा

374

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.28नोव्हेंबर):-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित व प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित स्थानिक विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्र्वर येथे कोरोना कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरू झाले. दि.२६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.संविधान दिनाच्या दिवशी मुंबई मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना सर्वात प्रथम श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अलका अ. भिसे तसेच आय. क्यू.ए. सी. समन्वयक डॉ. सुचिता खोडके मॅडम तसेच प्रमुख अतिथी प्राध्यापक राजीव तायडे इंग्रजी विभाग आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. निशांत जयस्वाल, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कविता काकडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अलका अ.भिसे यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानिक वागणुकीची विद्यार्थ्यांना शपथ दिली. प्रा‌.राजीव तायडे यांनी संविधान निर्मितीचा इतिहास विश्लेषणात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. पार्श्वभूमी पासून तर तर निर्मिती पर्यंत झालेले बदल आणि आजपर्यंत च्या संविधानाबाबत झालेल्या घडामोडी यांच्याबाबत विस्तृत विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले . तसेच प्रास्ताविकेचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले.

सन्माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अलका अनंत भिसे यांनी संविधानाबाबत आणि त्यामधील महत्वपूर्ण घटकाबाबत विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना अधिकार व कर्तव्य यांची जाणीव ठेवण्याची सुद्धा विद्यार्थ्यांना समजूत दिली. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अदीबा खान यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वाती धनगर हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here