



✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.28नोव्हेंबर):- युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.सूरज ठाकरे यांचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातत्याने सुरू असलेल्या जनसेवेला प्रेरित होऊन व स्थानिक पातळीवर गावोगावी जनतेपर्यंत पोहोचूण गावातील गंभीर समस्यांचे निवारण करण्याच्या कार्याला प्रेरित होऊन दिनांक:- २७/११/२०२१ ला जिवती तालुक्यातील टेकामांडवा या गावातील शेकडो तरुणांनी युवा स्वाभिमान पक्षात जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला.
व त्याचबरोबर पक्षाशी जुळलेल्या नवनियुक्त सदस्य तथा गावकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील व गावातील विविध समस्या जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगितल्या त्यातील काही गंभीर समस्या म्हणजेच जिवती तालुक्यातील भोळ्याभाबड्या नागरिकांचा या भागातील स्थानिक शासकीय कार्यालयांमध्ये काही अधिकारी तथा कर्मचारी उदा. तलाठी, सचिव व काही तहसील कार्यालयातील कर्मचारी ज्यांना गोरगरीब जनतेच्या करांमधून ६० ते ७० हजार रुपये महिना मिळतो असे कर्मचारी निशुल्क देण्यात येणाऱ्या कागदपत्रांसाठी ३०रु ते १००रु अशी लाच घेऊन काम करीत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगितली व याच बरोबर गावामध्ये रस्त्याची अत्यंत दुरवस्था असल्याचे व मुबलक पाणी, वीज, नुकसानग्रस्त गरजू शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असल्याचे सांगितले.
व विशेष म्हणजे गाव हागणदारी मुक्त करण्याकरिता शासनाच्या योजनेतून जी शौचालये कंत्राटदारा मार्फत बांधून दिल्या गेली ती अर्धवट व निकृष्ट दर्जाची बांधून दिल्याचा प्रकार प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना गावकऱ्यांनी ह्या वेळी दाखविला हे सर्व पाहता क्षणी जिल्हाध्यक्षांनी सदर नागरिकांना लवकरच या समस्या मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन देत तात्काळ या समस्या मार्गी लावण्याकरिता युवा स्वभिमान पक्ष सज्ज असल्याचे सांगितले. व टेकामांडवा या गावातील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली करिता जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या…





