



✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जालना(दि.28नोव्हेंबर):- वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे ,पूर्व जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुक संदर्भात वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा संपर्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत जालना जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुक असलेल्या ठिकाणी निवडणूक समिती जाहीर करण्यात आली.
या निवडणुक समितीत जालना पुर्व पश्चिम जिल्हा अध्यक्ष, त्या त्या ठिकाणचे शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष ,मराठवाडा उपाध्यक्ष ,सह बदनापूर साठी चंद्रकांत कारके, जाफ्राबाद साठी अँड कैलास रत्नपारखी, प्रा संतोष आढाव व प्रशांत कसबे ,मंठा साठी डॉ किशोर त्रिभुवन, घनसावंगी साठी सतिशराव खरात, विजयानंद शेळके, तर तिर्थापुरी साठी परमेश्वर खरात, देविदास कोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून पुढील नगरपंचायत निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयतुन दिलेले निरिक्षक आणि जालना पश्चिम जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे ,पूर्व जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांनी दिलेल्या निरीक्षक संगनमताने त्या त्या नगरपंचायत निवडणुकी संदर्भात जोमाने तयारी करा असे दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व नगरपंचायतच्या जागा पुर्ण ताकदीने लढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.यावेळी पश्चिम जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, पुर्व जालना जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने, सतिष खरात, अॅड कैलास रत्नपारखी, विष्णू खरात,ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत कारके, डॉ किशोर त्रिभुवन,प्रा संतोष आढाव,तुकाराम हिवराळे,कैलास रवि वाहुळे, सुभाष जाधव, सिद्धार्थ पैठणे, लहु धाईत, मिलिंद रगडे,गौतम वाघमारे,अर्जुन जाधव, पावलस वाघमारे, राजेभाऊ जाधव, रामदास दाभाडे, नजमोद्दीन शेख, मिलींद पारखे, गोपाल गावडे, सिद्धार्थ पारखे, सतिष म्हस्के, विष्णू गडवे, विकास रगडे, संदिप रगडे, रमेश रगडे सह वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





