



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.28नोव्हेंबर):-श्री गुरुदेव विद्यालय आणि महाराष्ट्र नशाबंदी मंडळ गडचिरोली शाखेचे वतीने संविधान दिनाचे आयोजन श्री गुरुदेव शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक तुषार निकुरे यांनी केले.
तर संविधान प्रास्ताविकाचे वाचन संदीप कटकुरवार यांनी केले. याप्रसंगी राज्य घटना संबंधित मौलिक विचार मांडत नागरिकांचे अधिकार आणि जबाबदारी यावर उपस्थित मंडळीनी प्रकाश टाकला. सौ.गीता पाटील,निकेश गेडाम,चेतन नंदनवार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थिती होते.


