



✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.28नोव्हेंबर):-निलगिरी बाग, औरंगाबाद रोड ,पंचवटी , नाशिक येथील विश्वरत्न बौद्ध विहार याठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.समाजभुषण बी एम ऐ गृप संस्थापक अध्यक्ष मोहनभाऊ आढांगळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य समता सैनिक दल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभा बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
अमोल खंदारे तसेच विश्वरत्न संस्थेचे अध्यक्ष साहेबराव वाळवंटे आणि विश्वस्त संतोष वाळवंटे यांनी मोलाचे परिश्रम घेतले तसेच विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकारी सदस्य मधुकर साळवे, विठ्ठल पगारे ,अनिल पटेकर, सिद्धार्थ वाघमारे, रमेश आव्हाड तसेच महिला अध्यक्षा सौ .अलकाताई शिंदे,बबिताताई वाळवंटे, ज्योती पानपाटील ,गवळीताई ,वाघमारेताई ,गवईताई , पंचफुला वाळवंटे तसेच बौद्धाचार्य व गायक मुंजा पटेकर, प्रभाकर ठोके तसेच कार्यक्रमासाठी मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रम प्रसंगी बौद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. विकासजी गायकवाड , गोपीनाथजी तुपसमुंदरे , गवईताई ,मुंजा पटेकर ,संतोष वाळवंटे या गायकांनी विविध गीते सादर केली . 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला. याप्रसंगी संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहनभाऊ आढांगळे यांनी या निलगिरी भागातील युवक ,युवती ,महिला व पुरुषांसाठी विविध उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्याचे कबूल केले .युवकांचा विकास करण्याचे सर्वांना आश्वासन दिले. लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.सर्व मान्यवरांनी संविधान याविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त संतोषजी वाळवंटे यांनी केले व आभार प्रदर्शन गोपीनाथ तुपसमुंदरे यांनी केले .


