Home महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीचे मारेकर?

आंबेडकरी चळवळीचे मारेकर?

108

आंबेडकरी समाज एकत्र आला असतांना काही विघ्नसंताेषी लाेक या समाजात अफवांचं बीज पेरत सुटलेत. आंबेडकरांना समर्थन देणाऱ्याना हे अंधभक्त म्हणतायत. खुप हुशार असणं कधी फार चांगलं नसतं, म्हणुन अंधभक्त असणं फायद्याचं असतं. आपल्यातील अतिशय हुशारीमुळे आपण गटातटाच्या राजकारणात विखुरले गेलाे आहाेत. ज्यांनी आंधळेपणाने आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवला त्यांचे नेते राजकारणात स्थिरावले आहेत. त्यांनी स्वतःला हींदू ह्रदय सम्राट म्हटलं आणि लाेकांनी ते आंधळेपणाने मान्य केलं. त्यांनी मंदिर वही बनायेंगे म्हटलं आणि लाेकांनी दुधाने धुतलेल्या विटा गाेळा केल्या. ते रथात बैसले आणि लाेक त्यांच्या मागे पायी चालू लागले.त्यांनी जयश्रीराम म्हटलं, त्यांनी दंगली घडविल्या .ते विधानसभा, लाेकसभेत गेलेत आणि लाेक जेलमध्ये, दवाखान्यात गेलेत. गळ्यात पदवी घालुन कामाच्या शाेधात फीरण्याचं वय असतांना त्या लाेकांनी आपल्या नेत्यांना साथ दिली.

या भानगडीत आपल्या नाेकरी धंद्याचा यांना विसर पडला. कलम ३७०, बालाकाेट, पुलवामा…त्यांच्या भाषणात आजही असतं. खरे तर ताे विषयच संपलाय. तरीही हे लाेक प्रचंड टाळ्या पीटतात. माेदी, शहाची निवडणुक प्रचाराची भाषणं बघा, ते म्हणतात, विराेधकांनी कलम ३७० विषयी आपली भुमिका स्पष्ट करावी. आता खरेच त्याची आवश्यकता राहीली आहे का?तुम्ही तीर मारलात आम्ही मान्य करताे. पण आता शेतकर्यांचे प्रश्न, बेराेजगार समस्या, शिक्षणाचा बाजार, माेडलेल्या जिल्हापरिषद शाळा, त्यातुन निर्माण झालेली बेराेजगारी याविषयी ते लाेक बाेलत नाही. त्यांना बुलेट ट्रेन हा विकास वाटताे. ऊडान पुल हा विकास वाटताे. बुलेट ट्रेन शेतकर्यांसाठी काेणत्या कामाची? हा साधा प्रश्न ते विचारत नाही. देशाच्या पाेशिंद्यासाठी काय याेजना आहेत? हे प्रश्न त्या लाेकांसाठी महत्वाचे नाहीत.सार्या हींदुत्ववादी संघटनांचे ते समर्थक आहेत. कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात अतिहुशार कुणीही नाही. सगळे भक्त आहेत. अगदीच अंधभक्त आहेत. ईडीने झाेडपुन काढलं तरी विक्रमी मताचं दान त्यांनी पारड्यात टाकलं. हे घडलं, कारण त्या लाेकांनी आपल्या नेत्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला.

टीका टिप्पणी करुन वेळ घालविला नाही. आपल्यातील अती हुशार लाेकांनी आपल्या नेत्याचं मनाेबल वाढवायचं साेडुन टीकाटीप्पणीत अधिक लक्ष घातलं. निवडणुकीच्या काळात आंबेडकरांवर चळवळच्या मारेकर्यांनी टीका करण्याची एकही संधी साेडली नाही. घराणेशाहीच्या आराेपापासुन ती सुरवात झाली. ती त्यांच्या पुजेपर्यंत येऊन ठेपली. त्यांना हींदु विचारसरणीचे वगैरे ठरवुन हे मारेकरी माेकळे झाले. दीक्षाभुमीवर अनेक हींदु नेते येतात. पण त्यांच्यावर बाकी हींदु बाैद्ध विचारसरणीचे झाल्याचा आराेप करत नाही. कारण ते आंधळेपणाने आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवतात. ते अंधभक्त आहेत.आणि अंधभक्त आहेत म्हणून त्यांचे नेते सत्ता गाजवतात. आपल्यातील चळवळीचे मारेकरी आपल्या नेत्याची चांगली वाजवतात.

काँग्रेस युतीसाठी हे मारेकरी प्राण पणाला लावल्यासारखे आंबेडकरांवर बरसले. निवडणुकीच्या रणधुमाळीत काही दात आणि नखं नसलेले पँथर्स आणि गर्भार असलेले दी रिपब्लिकन पक्ष प्रसवले नाही. पण वंचित किंवा एकुणच आंबेडकरी राजकारणावर आग आेकत राहीले. आणि तेही फक्त निवडणुकीच्या काळात! का ? तर हींदुत्ववादी भाजपला आवर घालण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी. आणि ईतक्याने आंबेडकरी जनता नाही ऐकली, मानली तर शेवटी या मारेकर्यांनी नेाटाचं बटन दाबण्याचा सल्ला आंबेडकरी जनतेला दीला. देशाची लाेकशाही वाचविण्याचा विडा जणू या मारेकर्यांनीच ऊचलला! पण बाबासाहेबांनी शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न आंबेडकरी जनतेच्या डाेळ्यात भरलं ते काय नाेटाचं बटन दाबण्यासाठी? नाेटाचं बटन दाबा पण वंचित किंवा समविचारी आंबेडकरी पक्षाला मत देऊ नका असा बालीश सल्ला या मारेकर्यांनी दिला. बाैद्धांची मते काँग्रेसला जातील असा युक्तीवाद लढवत ते म्हणाले, भाजपसेनेचा पराभव करु शकेल अशा काेणत्याही ऊमेदवाराला मते द्या. भाजप सेनेच्या मनसुब्यावर बाेट जसे हे मारेकरी ठेवतात तसं राज ठाकरेनही ठेवलं. लाेसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रभर भाषणं ठाेकली पण काँग्रेस राष्ट्रवादीला मत द्या असं राज ठाकरे बाेलला नाही. किंवा या पक्षांना मित्रही मानलं नाही.

विधासभेतही ताे एकटा लढला. खरेतर भाजपसेना शत्रु असेल तर शत्रुचा शत्रु आपला मित्र या न्यायाने राज ठाकरेनं काँग्रेसशी युती करायला हवी हाेती. पण त्याने ती केली नाही. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मैत्रीचं साेंग घेऊन गळाभेट करतात आणि पाठीत खंजीर घालतात हे ताे जाणून आहे.पण स्वतःला अतिशय हुशार समजणार्या मारेकर्यांनी पडद्याआडुन आंबेडकरी जनतेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत केलेल्या गद्दारीची ऊदाहरणे बघा ,मुंबईत सुरेश मानेंना बळीचा बकरा केला. भंडारा क्षेत्रात कवाडे सरांच्या मुलाचा सफाया केला. ईथे तर बुथ मांडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते तयार नव्हते असं ऐकण्यात आलं. सांगा,आंबेडकरी चळवळीच्या मारेकर्यांनाे आणि काँग्रसच्या तंबुतील गद्दारांनाे, या ऊमेदवारांना मते द्यायच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चे मतदार कुठे गेले हाेते?हीच युती आणि मैत्री आहे का?

वंचित चे ऊमेदवार पडले आणि लगेच या मारेकर्यांनी वँटसअपवर लिहिलं,प्रकाश आंबेडकरांनी काय मिळविलं?

प्रकाश आंबेडकर चुकीच्या दीशेन जातायत का?

भाजपने सेनेशी युती केली

काँग्रेस ने राष्ट्रवादीशी युती केली.

प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत ते एकटे लढले…

अशा पाेस्ट फीरु लागल्या.त्यांना मी विचारताे आहे,वंचितसाठी तुमचं काय याेगदान आहे?काय याेगदान हाेतं? तुम्ही तर कायम विराेधात राहीलात.वंचित च्या पराभवाचं श्रेय तुम्हालाही जातं.मग आज वंचितच्या पराभवाचं टीकात्मक परिक्षण करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कसा काय असु शकताे?हा या मारेकर्यांना माझा सवाल आहे.दी रिपब्लिकन चा पक्ष गर्भार आहे.पँथर्स सैरभैर झालेत.काहींनी भाजप जवळ केलं.काही काँग्रेसवासी झालेत.काहींचा पक्षावर विश्वासच नाही.ते संघटनात्मक कार्यावर विश्वास ठेवतात.संघटनेच्या माध्यमातुन प्रश्न साेडवता येतात असा या पँथर्सचा विश्वास आहे.हे आंबेडकरी चळवळीसाठी अतिशय घातक आहे.आंबेडकरी चळवळीच्या या जहाल मारेकर्यांपासुन सावध रहा!

✒️राजू बाेरकर(लाखांदुर,जि.भंडारा)मो:-७५०७०२५४६७

Previous articleगंगाखेड चा भाग्य विधाता आसल्याचे चित्र रंगवतात
Next articleनिलगिरी बाग येथे भारतीय बौद्ध महासभा शाखेचे उध्दघाटन व संविधान वाचन उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here