Home महाराष्ट्र संविधान दिनानिमित्त ‘संविधान करंडक’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

संविधान दिनानिमित्त ‘संविधान करंडक’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

114

✒️नितीन राजे(सातारा-खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.27नोव्हेंबर):-संविधान दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ सामाजिक संस्था, खटाव आणि बौद्ध विकास तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्द विहार आंबेडकर नगर खटाव ता‌.खटाव येथे ‘संविधान करंडक’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या‌.स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे व डाॅ.अभिमान जाधव यांचे हस्ते संविधान पुजन करुन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पूण व अभिवादन करून करण्यात आला.या समयी संगीत दरेकर यांनी स्वागत गीत गायले.यावेळी कु.रजनी सावंत हिने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.

सदर स्पर्धेत सुमारे शंभर स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती.प्रत्यक्ष स्पर्धेत लहान गटात साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर मोठ्या गटात बीस स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक -शिवतेज किरण देशमुख याने पटकावला.
द्वितीय क्रमांक- निलेश दीपक यादव याने मिळविला.तृतीय क्रमांकाचा मानकरी यशराज आप्पा हेगडे ठरला.तर उत्तेजनार्थ क्रमांक -रचना रवींद्र बल्लाळ या स्पर्धकाने संपादन केला.स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी आयत्या वेळी स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही निवडक स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षिसे जाहीर केली. या मध्ये प्रथम क्रमांक सलोनी नितीन सावंत हीस मिळाला.द्वितीय क्रमांक साईश गणेश फडतरे , तृतीय क्रमांक चैतन्य नरेश चव्हाण, चतुर्थ ओम दाभाडे ,पंचम प्रांजल ज्ञानेश्वर कास्ते,षष्ठ स्वर्णिमा राहुल गायकवाड,सप्तम सही बनसोडे आदि स्पर्धकांनी यश संपादन केले.

सदर स्पर्धेतील मोठा गटातील प्रथम क्रमांकांचा विजेता ठरला -स्वप्निल सचिन पलुस्कर.तसेच द्वितीय क्रमांक- यश अनील खडके याने मिळवीला, तृतीय क्रमांकाचा विजेता -अनुष्का शंकर मोरे ठरली‌.तर उत्तेजनार्थ क्रमांक -साक्षी संजय पाटोळे हीस मिळाला.संविधान करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपन्न होताच संध्याकाळच्या समयी मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयदिप शिंदे, अशोकराव जाधव, डॉ.अभिमान जाधव,सुरज घाडगे,प्रमोद कांबळे, दिलिप कांबळे, मनोहर पाटेकर,बुद्धम सावंत, संजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.अमृत साळुंखे व प्रा.किरण देशमुख यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन सिद्धार्थ सामाजिक संस्थेचे सचिव नितीन सावंत व विठ्ठल जगताप यांनी केले.तसेच सर्वं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी येथील नवयुवकांचे व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोलाचं सहकार्य लाभले अशी माहिती सिद्धार्थ सामाजिक संस्थेचे सचिव नितीन सावंत यांनी दिली.अशा स्पर्धेतून मूलांच्या अंगी असणा-या कला गुणांना नक्कीच वाव मिळाणार असल्याने परिसरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here