Home महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

118

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26 नोव्हेंबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा, ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी येथे संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान.माधुरी भंडारे, एकात्मिक बाल विकास अधिकारी ब्रह्मपुरी लाभल्या होत्या. याप्रसंगी प्रा. डॉ. जगदीश मेश्राम तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा शीलवंत रामटेके विचार मंचावर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक मान. माधुरी भंडारे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून संविधानातील मौलिक अधिकार याविषयी विवेचन केले.

प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी संविधान निर्मितीचा इतिहास सर्वांसमोर मांडला तर प्रा. शीलवंत रामटेके यांनी भारतीय संविधान हाच या देशातील तमाम जनतेचा धर्मग्रंथ आहे असे प्रतिपादन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी संविधानाची जाणीव आणि जागृती सामान्य माणसांपर्यंत जो पर्यंत पोचणार नाही तोपर्यंत या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही असे मत प्रकट केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. रुपेश मेश्राम यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट्स बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here