Home Education महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे संविधानाचा जागर

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे संविधानाचा जागर

115

🔹”माझे संविधान – माझा अभिमान ” अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न.

✒️पी.डी.पाटील(विशेष प्रतिनिधी)

धरणगांव(दि.२६नोव्हेंबर):-२०२१ शुक्रवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथे संविधान दिनानिमित्त ” संविधानाचा जागर ” उत्साहात साजरा करण्यात आला.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम. के.कापडणे, पर्यवेक्षक जे. एस.पवार यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुजन करण्यात आले.

यानंतर शाळेतील उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले व शपथ घेतली. माझे संविधान माझा अभिमान या अंतर्गत शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, संविधानातील कलमे, परिशिष्टे, मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर शाळेतील उपशिक्षक व्ही.टी. माळी यांनी संविधानामुळे आपला भारत देश अखंड आहे. सर्व भारतीयांना एकत्र करण्याचं काम कायद्याचे पुस्तक संविधानाने केलेले आहे.

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. असे संविधान आपल्याला शिकवते असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी.आर.सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचा आदर करून संविधानाच्या नियमानुसार वाटचाल करावी. संविधानाने स्वातंत्र्य – न्याय – समता – बंधुता प्रस्थापित केली. आपण सर्वांनी आपली मूलभूत कर्तव्य पार पाडावीत.कार्यक्रमाच्या शेवटी २६.११ च्या मुंबई हल्यात शहीद जवानांना सामूहिक श्रद्धाजंली वाहण्यात आली.या संविधान जागर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख एस.एन.कोळी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधु – भगिनी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here