Home महाराष्ट्र कडा येथील रस्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे – डॉ.अजय दादा...

कडा येथील रस्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे – डॉ.अजय दादा धोंडे

380

🔸भाजप युवा मोर्च्याच्यावतीने तहसीलदार यांना दिले निवेदन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26नोव्हेंबर):-अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ बँक खात्यावर वर्गकरून,विज बिल आठ हजार रुपये ऐवजी पाच हजार रुपये,शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे या व आदी मागणीसाठी कडा येथे महावितरण कार्यालयासमोर शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन होणार आहे,तरी या रस्ता रोको आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे यांनी केले.

आष्टी,पाटोदा,शिरूर (का) तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे.पाणी उपलब्ध असूनही तालुक्यातील महावितरण कंपनीने जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन बंद केल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देता येणे शक्य नाही यामुळे आधी अतिवृष्टी,कोरोना महामारी व यानंतर महावितरणने सुरू केलेल्या सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.पश्चिम महाराष्ट्रात वीज कनेक्शनसाठी पाच हजार रुपये बिल घेऊन जोडणी सुरू करून देण्यात आली मात्र आष्टी,पाटोदा,शिरूर तसेच बीड जिल्ह्यात महावितरणकडून अन्यायकारकरित्या आठ हजार रुपये भरण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जात आहे आणि दुष्काळ,अतिवृष्टीचा सामना करावा लागल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे.

शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी तीन हजार व दोन हजार रुपयांचे दोन टप्पे पाडून देऊन वीज बिल भरणा करून घेण्यात यावा व तात्काळ वीज जोडणी करून द्यावी तसेच अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्याचे निवेदन आष्टी तहसिदार यांना देण्यात आले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंतराव थोरवे,माजी सभापती बापुराव गर्जे,माजी नगरसेवक दादासाहेब गर्जे,बाळासाहेब शिंदे,माजी पं.सं.सदस्य बाबासाहेब गर्जे,एन.टी.गर्जे,दत्ताभाऊ बोडखे,भाजपा जिल्हा सचिव शंकरराव देशमुख,सरपंच सावता ससाणे,सरपंच चंद्रशेखर साके,रघुनाथ शिंदे,ॲड.खेडकर,सरपंच तात्यासाहेब कदम,आज्जुभाई शेख,अस्ताक शेख,आण्णासाहेब लांबडे,सदाशिव दिंडे पाटील,दादासाहेब जगताप,रेहान बेग,जाकेर कुरेशी,आस्लम आतार,विनोद निकाळजे,इम्रान खान,शाहनवाज पठाण,वसिम शेख,नितीन निकाळजे,निंबाळकर,अरुण सायकड,अजिनाथ बेल्हेकर,किरण धोंडे आदी कार्यकर्ते,पदाधिकारी सरपंच,उपसरपंच मोठ्या उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here