Home Education आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथे संविधान दिवस निमित्त विविध स्पर्धा….

आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथे संविधान दिवस निमित्त विविध स्पर्धा….

90

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.26नोव्हेंबर):-आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द ता धरणगाव येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . तसेच 26 / 11 च्या दहशतवादी हल्ला शहीद यांना अभिवादन करण्यात आले .या वेळी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली . संविधान दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

या वेळी आर एस पाटील सर यांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आपले हक्क अधिकार, व संविधानिक महत्त्व अधोरेखित केले.प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ. व्ही एम चौधरी मॅडम , उपशिक्षक आर आर पावरा , एस के शिंदे , एस . ए पवार , जे एस पाटील , सॊ मनीषा पाटील आदी उपस्थित होते . आभार पुष्प शरीफ पटेल यांनी गुंफले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here